Rohit Pawar  saam tv
लोकसभा २०२४

Rohit Pawar: तू आजोबांबरोबर गेला नसता तर..., रोहित पवारांना त्यांच्याच मुलांनी दिला होता दम

Rohit Pawar On Split In The Pawar Family: अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेत पक्षात बंडखोरी केली. त्यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले. अजित पवारांच्या (Ajit Pawar) या भूमिकेमुळे पवार कुटुंबीयांमध्ये फूट पडली. काही जण शरद पवार यांच्या बाजूने गेले. तर काहींनी अजित पवार यांना पाठिंबा दिला.

Priya More

मंगेश कचरे, बारामती

'तू जर आजोबाबरोबर नसता राहिला तर आम्ही तुझ्याशी बोललो नसतो.' असा दम आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांना त्यांच्या मुलांनी दिला होता. इंदापूरमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाच्या (Baramati Loksabha Election 2024) महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेत भाषण करताना रोहित पवार यांनी हा किस्सा सांगितला.

अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेत पक्षात बंडखोरी केली. त्यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले. अजित पवारांच्या (Ajit Pawar) या भूमिकेमुळे पवार कुटुंबीयांमध्ये फूट पडली. काही जण शरद पवार यांच्या बाजूने गेले. तर काहींनी अजित पवार यांना पाठिंबा दिला. अजित पवार यांच्या या निर्णयामुळे सर्वांना मोठा धक्का बसला. यावेळी रोहित पवार हे ठामपणे शरद पवार यांच्यासोबत राहिले. या घटनेवेळी रोहित पवार यांच्या मुलांनी नेमकं काय मत व्यक्त केले होते हा कौटुंबिक किस्सा रोहित पवार यांनी इंदापूरमध्ये सांगितला.

रोहित पवार यांनी इंदापूरच्या सभेत सांगितले की, 'आमचे आजोबा शरद पवार यांनी 60 वर्षे जो विचार जपला. तो ते आजही जपत आहेत. त्यांनी त्यांची भूमिका बदललेली नाही. जेव्हा ही कुटुंब फुटल्याची घटना घडली तेव्हा माझ्या लहान मुलांनी मला विचारले होते की, तू कुणाबरोबर आहेस. मी सांगितले मी आजोबांबरोबर आहे. त्यावर ते म्हणाले होते की, तू जर आजोबा बरोबर गेला नसता तर आम्ही तुझ्याशी बोललो नसतो.'

तसंच, 'आता आम्ही लहान आहोत. ज्या वेळेस आम्ही शिकून मोठे झालो असतो. त्यावेळेस तुला सांगितलं असतं की आता तू तुझं वेगळं घर बघ. याची भीती अशी आहे की 15 वर्षांनी माझी मुलं देखील मला म्हटले असते की जा आता तू गेट आउट...यातून मला युक्तिवाद राहिला नसता. कारण मी माझ्या आजोबांबरोबर असं वागलो असतो तर माझी मुलं माझ्यासोबत अशी वागली असती.' असे रोहित पवार यांनी सांगितले. रोहित पवारांनी सांगितलेल्या या कौटुंबिक किस्स्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

दरम्यान, बारातमी लोकसभा मतदारसंघामध्ये पवार कुटुंबातील दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सुनेत्रा पवार विजयी व्हाव्या यासाठी महायुतीकडून या मतदारसंघात जोरदार सभा आणि बैठका घेतल्या जात आहेत. तर सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा नारळ फोडत शरद पवार यांनी सभा घेतली. आता रोहित पवार इंदापूर दौऱ्यावर असून ते सुप्रिया सुळेंच्या प्रचारार्थ सभा घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT