Dharashiv Loksabha: ब्रेकिंग! ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटील यांना निवडणूक आयोगाची नोटीस; प्रकरण काय?

Archana Patil Vs Omraje Nimbalkar: शिवसेना ठाकरे गटाचे नेते ओमराजे निंबाळकर आणि महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे.
Dharashiv Loksabha: ब्रेकिंग! ओमराजे निंबाळकर आणि अर्जना पाटील यांना निवडणूक आयोगाची नोटीस; प्रकरण काय?
Archana Patil Vs Omraje Nimbalkar: Saamtv
Published On

बालाजी सुरवसे, धाराशिव|ता. २२ एप्रिल २०२४

धाराशिव लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते ओमराजे निंबाळकर तसेच महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. आचारसंहिता भंग केल्याचा ठपका ठेवत दोन्ही उमेदवारांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

दोन्ही उमेदवारांना निवडणूक आयोगाची नोटीस..

धाराशिव लोकसभेसाठी महायुतीकडून भाजप आमदार राणाजगजितसिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील आणि महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांच्यामध्ये लढत होणार आहे. दोन्ही उमेदवारांनी प्रचारसभांचा धडाका सुरू केला आहे. अशातच ओमराजे निंबाळकर यांना केंद्रिय निवडणूक आयोगाने नोटीस पाठवल्याचे समोर आले आहे.

काय आहे प्रकरण?

एका सभेत बोलताना ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी तेरणा हॉस्पिटलने रुग्णावर उपचार करण्यासाठी सरकारकडून १८ कोटी रुपये घेतले असा आरोप राणाजगजितसिंह पाटील यांनी केला होता. त्याचबरोबर उमेदवारी अर्ज दाखल करताना घेतलेल्या प्रचार सभेत अर्चना पाटील यांनी ५००/१००० रुपये देऊन गर्दी जमा केल्याची तक्रारही ओमराजेंनी केली होती.

Dharashiv Loksabha: ब्रेकिंग! ओमराजे निंबाळकर आणि अर्जना पाटील यांना निवडणूक आयोगाची नोटीस; प्रकरण काय?
Solapur News: विहिरींनी तळ गाठला, बोअरवेल आटले.. सोलापुरात पाणी टंचाईच्या झळा; दूषित पाण्यामुळे नागरिक हैराण

दरम्यान, हा आरोप चुकीचा असल्याचे सांगत अर्चना पाटील यांनी ओमराजेंची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी नोटीस जारी केली आहे. आचारसंहिता भंगाच्या तक्रारीच्या अनुषंगाने सबळ पुरावे तात्काळ सादर करण्याचे आदेश ओमराजे निंबाळकर यांना देण्यात आले आहेत.

Dharashiv Loksabha: ब्रेकिंग! ओमराजे निंबाळकर आणि अर्जना पाटील यांना निवडणूक आयोगाची नोटीस; प्रकरण काय?
Beed Lok Sabha : ज्योती मेटेंची माघार; बीडमध्ये आता तिरंगी लढतीची शक्यता

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com