Satara Lok Sabha Election Candidate Shashikant Shinde VS Udayanraje Bhosale Saam TV
लोकसभा २०२४

Satara Lok Sabha Constituency: साताऱ्यात उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदेंमध्ये काटे की टक्कर, कोणाला यश मिळणार?

Priya More

सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये (Satara Lok Sabha Constituency) यावेळी दुहेरी लढत पाहायला मिळाली. या मतदारसंघातून महायुतीकडून भाजप नेते उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी निवडणूक लढवली. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी निवडणूक लढवली. या मतदार संघामध्ये दोघांमध्ये तगडी लढत झाली. आपआपल्या उमेदवारासाठी दोन्ही पक्षांनी आपली ताकद पणाला लावली होती. या दोन्ही नेत्यांमध्ये तकडी फाइट पाहायला मिळाली.

साताऱ्यामध्ये महायुतीकडून उदयनराजे भोसले यांना उशिराने उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे त्यांना प्रचारासाठी कमी वेळ मिळाला. असे असले तरी देखील या मतदारसंघामध्ये आपला उमेदवार जिंकून यावा यासाठी भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावली होती. या मतदारसंघामध्ये २०१९ मध्ये झालेला पराभव लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसकडून हा मतदारसंघ आपल्याकडे काबिज करण्यासाठी भाजपने जोरदार प्रचार केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळालेल्या शशिकांत शिंदे यांनी या मतदारसंघामध्ये जोरदार प्रचार केला. त्यांनी प्रचारासाठी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता.

उदयनराजे भोसले विजयी व्हावे यासाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सभा झाली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणजेच शरद पवारांना या मतदारसंघामध्ये आपलाच उमेदवार निवडून आणत हा मतदारसंघ सोडायचा नाही. त्यामुळे या मतदारसंघामध्ये शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली होती. महत्वाचे म्हणजे या मतदारसंघामध्ये 'बिग बॉस' फेम अभिनेता अभिजीत बिचुकले देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या मतदारसंघाची या निवडणुकीत जोरदार चर्चा रंगली. या मतदारसंघामध्ये ५७.३८ टक्के मतदान झाले होते. या मतदारसंघामध्ये प्रमुख लढत उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यामध्ये झाली. आता सातारकर नेमकी कोणाला पसंती देतात हे ४ जूनला कळेल.

दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये २००९ पासून ते २०१९ पर्यंत उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीचे खासदार राहिले. पण २०१९ मध्येच उदयनराजे भोसले यांनी नाराज होत राष्ट्रवादीला रामराम ठोकत खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे या मतदारसंघामध्ये पोटनिवडणुक झाली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील विरुद्ध भाजपच्या उदयनराजे भोसले यांच्यामध्ये लढत झाली होती. या निवडणुकीमध्ये श्रीनिवास पाटील हे ६,३६,६२० मतांनी विजयी झाले होते. तर उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला होता त्यांना ५,४८,९०३ इतकी मतं मिळाली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : खासदार हेमंत सावरा यांच्या घराबाहेर ओबीसी संघटनेचे आंदोलन व घोषणाबाजी

Healthy Fruits: स्ट्रॅाबेरी ते अननस; ही आहेत पौष्टिक आणि निरोगी असणारी फळे

ताजमहालाच्या तळाशी आहेत 50 विहिरी, तुम्हाला माहितीये यामागील रहस्य!

VIDEO : थेट घरात घुसून महिलेवर अत्त्याचार; सुसंस्कृत पुण्यात पोलिसांचा धाक संपला?

उपमुख्यमंत्र्याच्या पोरानं कायदा मोडला; RTO ने पकडला, ७ हजारांना भुर्दंड!

SCROLL FOR NEXT