गणेश कवाडे, मुंबई, ता. २१ मे २०२४
लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यातील मतदान काल पार पडले. मुंबई, ठाणे, कल्याणसह १३ लोकसभेच्या जागांसाठी हे मतदान झाले. या मतदानादरम्यान अत्यंत संथ गतीने यंत्रणांनी काम केल्याने मुंबईकर नागरिकांनी संताप व्यक्त केला. यावरुनच शिवसेना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगासह, केंद्र सरकारवर संशय व्यक्त केला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
"मुंबईमध्ये अत्यंत कासवतेने मतदान प्रक्रिया राबवा. विशेषता जिथे महाविकास आघाडीची सरशी होऊ शकते असे बुथ विधानसभा क्षेत्र, लोकसभा संघात जास्तीत जास्त गोंधळ निर्माण होईल असे काम करा अशी कोणती स्ट्रॅटर्जी निर्माण केली का असा प्रश्न निर्माण झाला आहे," अशी शंका संजय राऊत यांनी उपस्थित केली.
"जिथे महाविकास आघाडीची सरशी होईल अशा ठिकाणी मतदान यंत्रणा बिघडवून ठेवण्यात आले होते. एका मतदाराला दहा ते पंधरा मिनिटं लागत असल्याचे उघडकीस आले आहे. मुंब्रातील एका मतदारसंघांमध्ये एका तासांमध्ये फक्त 11 लोकांनीच मतदान केले. भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट मतदान प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करत होते, त्यांच्यामध्ये प्रभावाची भीती आहे हे आम्ही निवडणूक आयोगाच्या निदर्शनामध्ये आणले आहे," असेही संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, पुण्यातील अपघातावरुनही संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. पुणे पोलीस आयुक्त नेमकं कोणाला मदत करत आहेत. बिल्डरांचा मुलगा दारू पिताना दिसतोय, त्याचे व्हिडिओ समोर आलेत. तरीही खोटा रिपोर्ट देण्यात आला आहे. अजित पवार गटाचा आमदार भ्रष्ट आहे, असा आरोप करत पुणे पोलिसांना बडतर्फ केले पाहिजे, असेही संजय राऊत म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.