Sanjay Nirupam Saam Digital
लोकसभा २०२४

Sanjay Nirupam : त्यावेळी माझ्यासोबत दगाफटका...; शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करताच संजय निरुपम यांनी सांगितला तो किस्सा

Sandeep Gawade

संजय निरुपम यांनी ठरल्याप्रमाणे आज एकनाथ शिंदे याच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. संजय निरुपम यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला बळ मिळालं आहे. पक्षप्रवेशावेळी त्यांनी आपण शिवसेवेत का प्रवेश केला याविषयी भूमिका मांडताना काँग्रेससच्या नेत्यांवर टीका केली आहे. २० वर्ष काँग्रेस मध्ये होतो, त्यामुळे यावेळी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा होती, मात्र आपल्यासोबत दगा फटका झाल्यांची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

लोकसभा निवडणुकी संकेत मिळाल्यापासून संजय निरूपम काँग्रेसच्या नेत्यांवर नाराज असल्याचं पहायला मिळालं होतं. त्यानंतर त्यांनी जाहीरपणे या नेत्यांविरोधात वक्तव्य केली होती. तसंच भाजपच्या काही नेत्यांची भेटही घेतली होती. त्यामुळे काँग्रेसने त्यांंच्यावर ६ वर्षांची निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर निरुपम एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या.

दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत त्यानी यावर शिक्कामोर्तब करत जाहीर भूमिका मांडली होती. आता तब्बल २० वर्षांनंतर संजय निरुपम यांची पुन्हा घरवासी झाली असून आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

बाळासारेबांनी दोन वेळाराज्यसभेवर पाठवलं

धडाडीचे नेते म्हणून संजय निरुपम यांची ओळख आहे. त्यांना बाळासाहेबांनी दोन वेळ राज्यसभेवर पाठवलं. लोकसभेसाठी इच्छुक असताना देखील एकदा बोलल्यानंतर पक्षाच काम करण्यासाठी तयार झाले. यापुढे पक्षात त्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल असा विश्वास देत हा ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT