Sangali Loksabha Election 
लोकसभा २०२४

Loksabha Election: सांगलीत मशाल की विशाल? कोणाची राहणार पाटीलकी?

Sangali Loksabha Election : काँग्रेसचे बंडखोर नेते विशाल पाटील यांचा विजय होण्याचा अंदाज एक्झिट पोलने दिल्याने पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे नेते एकमेकांसमोर आले आहेत. नाना पटोले आणि संजय राऊत यांनी एकमेकांवर शाब्दिक हल्लाबोल केलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तन्मय टिल्लू, साम प्रतिनिधी

काही तासांत लोकसभेचा निकाल येणार आहे. मात्र मविआतला सांगलीवरून सुरू झालेला वाद शमायला तयार नाही. सांगलीत काँग्रेस बंडखोर विशाल पाटलांवरून पुन्हा ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जुंपलीय. राऊत आणि नाना पटोलेंनी थेट एकमेकांचं गोट्या खेळणं काढलंय. यावरचा हा रिपोर्ट..

महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून परत एकदा खडाजंगी रंगल्याचं पाहायला मिळतंय. सांगलीमध्ये अपक्ष आमदार विशाल पाटील हेच बाजी मारणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात येतोय. सांगलीत यंदा तीन पाटलांमध्ये थेट लढत झाली. भाजपनं संजयकाका पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. तर, काँग्रेसला विश्वासात न घेता ठाकरे गटानं चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली.

त्यामुळे विशाल पाटील यांनी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अपक्ष चंद्रहार पाटील आणि संजयकाका पाटील यांच्याविरोधात शड्डू ठोकला.अशात काँग्रेस आमदार विश्वजित कदमांनी अप्रत्यक्षपणे मित्र विशाल पाटलांसाठी जिवाचं रान केल्याची चर्चा सांगलीसह राज्यात रंगली. विशाल पाटलांना एक्झिट पोलमध्ये आघाडी मिळताना दिसतेय. त्यामुळे विश्वजित कदम यांनी विशाल पाटलांचा विमान दिल्लीला लॅण्ड केल्याचं बोललं जात आहे. यावरून खासदार संजय राऊतांनी इशारा दिलाय. तर नाना पटोलेंनीही राऊतांना टोला लगावलाय.

सांगलीतील जागा विशाल पाटलांनी पटकवल्यास मविआतील बेबनाव आणखी वाढताना दिसेल..आगामी विधानसभेत ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक उफाळून येण्याची दाट शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाफेडने मांडला कांदा खरेदीचा खेळ; पहिल्याच दिवशी फज्जा, बळीराजाची थट्टा

Malpua Recipe: घरच्या घरी बनवा खमंग आणि गोड मालपुआ, वाचा सोपी रेसिपी

Samir Choughule: समीर चौघुले घेऊन येतोय नात्यांचा गोडवा; 'साखर खाल्लेला माणूस'ची प्रदर्शन तारीख जाहीर

राज्यात बोगस शाळांचा सुळसुळाट; बोगस शाळांची यादी 'साम टीव्ही'च्या हाती

Fact Check : 200 च्या नोटेवर अब्दुल कलाम? व्हायरल फोटोमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT