Vinayak Raut Criticized On Narayan Rane Saam Tv
लोकसभा २०२४

Ratnagiri Sindhudurg : विनायक राऊतांनी नारायण राणेंचा भूतकाळ काढला; अनेक गोष्टी सांगून टाकल्या!

Vinayak Raut Criticized On Narayan Rane: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करणाऱ्या नारायण राणे यांचा भूतकाळच विनायक राऊत यांनी वाचून दाखवला आहे. उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलण्याचा नारायण राणे यांना नैतिक अधिकार नसल्याची टीका विनायक राऊत यांनी केली आहे.

Priya More

रत्नागिरी - सिंधुदुर्गमधुन लोकसभा मतदारसंघातून (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Election) महाविकास आघाडीकडून विनायक राऊत (Vinayak Raut) आणि महायुतीकडून नारायण राणे (Narayan Rane) निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यापासून दोन्ही नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशामध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करणाऱ्या नारायण राणे यांचा भूतकाळच विनायक राऊत यांनी वाचून दाखवला आहे. उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलण्याचा नारायण राणे यांना नैतिक अधिकार नसल्याची टीका विनायक राऊत यांनी केली आहे.

विनायक राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'सत्तेसाठी लाचार झालेल्या नारायण राणे यांना उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. नारायण राणे यांनी आपला भूतकाळ आठवावा. तुम्ही एवढे अब्जाधिश कसे झालात. चेंबूरच्या नाक्यावर असणारा माणूस आज जुहूच्या समुद्रकिनाऱ्यावरील नऊ मजली इमारतीत जाऊन राहतो. कोणाच्या मेहरबानीने मुख्यमंत्री होतो. संपत्ती कशी कमावली या सगळ्याचा हिशोब द्या. उद्धव ठाकरेंवर आरोप करण्याची राणेंची कॅसेट जुनी आहे.', अशा शब्दात विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर निशाणा साधला.

उद्धव ठाकरे यांची कोकणामध्ये सभा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी रस्ता बंद करण्याचा इशारा दिला होता. यावर बोलताना विनायक राणे यांनी नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला. 'नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना इशारा देण्यापेक्षा तुम्हाला स्वतःला कोणती बीळं लपायला आहेत ती शोधा. शिवसैनिक मेलेल्या आईचे दूध प्यायलेला नाही. तुम्हाला कोणत्या बिळात घालून ठेवू हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. निवडणुकीच्यानंतर यांना बिळातच जावं लागणार आहे बाकी रस्ते तर सोडाच.', अशा इशारा विनायक राऊत यांनी दिला आहे.

विनायक राऊत यांनी प्रसाद लाड यांच्यावर देखील टीका केली आहे. 'प्रसाद लाड यांना ज्या पक्षाने वाढवलं त्याच्याशी बेइमानी करून आता भाजपची सेवा करायला गेले आहेत. तुम्हीसुद्धा रेमडेसिविर इंजेक्शनच्या माध्यमातून किती करोड रुपये त्या कंपनीकडून उकळले आहेत ते सुद्धा तुम्ही सांगा. कोरोनाच्या काळामध्ये पी एम केअर फंडातून हजारो करोडचा निधी जमा केला आहे त्याचं ऑडिट करू शकत नाही. त्या फंडाचा हिशोब तुम्ही दिलाय का?', असा सवाल त्यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मी आता आझाद झालोय! घटस्फोटाच्या आनंदात पठ्ठ्याची दुधाने अंघोळ, व्हिडिओ व्हायरल

Stunt Artist Raju Death : सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना; प्रसिद्ध कलाकाराचा जागीच मृत्यू

प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं; संभाजी ब्रिगेड आक्रमक

युतीसाठी ठाकरेसेनेचं रोखठोक,ठाकरेंचा चेंडू शिवतीर्थच्या कोर्टात,राज ठाकरेंचे मौन कधी सुटणार?

Mumbai : मुंबईत हवालदारानं स्वत:ला संपवलं, घरात संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT