ramraje naik nimbalkar reveals information of meeting with devendra fadnavis ajit pawar on madha lok sabha constituency Saam Tv
लोकसभा २०२४

'माढा'चा तिढा वाढला! महायुतीचा धर्म पाळा, रामराजे नाईक निंबाळकरांना नेत्यांच्या कानपिचक्या, राजेंनीही ठणाकवून सांगितलं कार्यकर्त्यांशी चर्चा करेन (video)

या बैठकीस खासदार रणजितसिंह निंबाळकर, माण-खटावे आमदार जयकुमार गाेरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटणचे माजी नगराध्यक्ष अनिकेतराजे नाईक निंबाळकर हे नेते उपस्थित हाेते.

Siddharth Latkar

- सचिन जाधव

Madha Lok Sabha Constituency :

माढा लाेकसभा मतदारसंघात नाराज असलेले राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर (ramraje naik nimbalkar) यांना आज (मंगळवार) महायुतीचा धर्म पाळा अशी सूचना महायुतीमधील नेत्यांकडून करण्यात आली. त्याचवेळीस याच बैठकीत रामराजे यांनी नेत्यांना स्थानिक स्तरावरील कार्यकर्त्यांशी, लाेकसभा मतदारसंघातील समविचारी नेत्यांशी चर्चा करुन निर्णय देईन असे स्पष्ट केले. खूद्द राजेंनीच त्याबाबतची माहिती समाज माध्यमातून जनतेपर्यंत पाेहचवली आहे. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर (bjp mp ranjitsinh naik nimbalkar) यांना जाहीर केली. त्यानंतर या मतदारसंघात इच्छुक असलेले दाेन गट रामराजे नाईक निंबाळकर गट, विजयसिंह मोहित पाटील गट हे नाराज झाले आहेत. या दाेन्ही गटाची नाराजी दूर करण्यात अद्याप महायुतीच्या नेत्यांना यश आलेले नाही.

आज मुंंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar) यांच्या समवेत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या समवेत बैठक झाली. या बैठकीस खासदार रणजितसिंह निंबाळकर, माण-खटावे आमदार जयकुमार गाेरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटणचे माजी नगराध्यक्ष अनिकेतराजे नाईक निंबाळकर हे नेते उपस्थित हाेते.

दरम्यान या बैठकीनंतर रामराजे नाईक निंबाळकर यांनी समाज माध्यमातून माढा लोकसभा मतदारसंघाबाबत मुंबईत झालेल्या बैठकीचा वृत्तांत जनतेपुढे मांडला. त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेईन असे लिहिलं. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन ही केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये महावितरण अधिकारी कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा उघड

Rinku Rajguru: हातात टाळ, डोक्यावर तुळस, विठुरायाच्या भक्तीत दंगली रिंकू राजगुरू

ठाकरे बंधू फक्त ५ तारखेपर्यंतच एकत्र? राज ठाकरेंच्या जवळच्या नेत्यानं सांगितली पुढची रणनीती| VIDEO

Pakistani Celebrities Banned in India: भारताने 'या' पाकिस्तानी सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया अकाउंटवर २४ तासांत पुन्हा घातली बंदी

Leftover Rice: शिळा भात खाल्ल्यास आरोग्यावर कोणते परिणाम होतात?

SCROLL FOR NEXT