Shrikant Shinde  Saam Tv
लोकसभा २०२४

Kalyan Lok Sabha: राज ठाकरेंचे जे विचार आहेत, तेच आमचे विचार, मनसे शिवसेनेचा डीएनए एकच: श्रीकांत शिंदे

Shrikant Shinde News: आम्ही दोन्ही पक्ष एकाच विचारधाराने बांधले गेलो आहोत आणि एकाच विचारधाराने पूर्ण पक्ष चालतायत. राज ठाकरेंचे जे विचार आहेत, तेच शिवसेनेचे विचार आहेत. म्हणून शिवसेना मनसेचा डीएनए एकच आहे. त्यामुळे आम्हाला लगेच एकत्र येता आलं: श्रीकांत शिंदे

साम टिव्ही ब्युरो

Kalyan Lok Sabha:

>> अभिजित देशमुख

आम्ही दोन्ही पक्ष एकाच विचारधाराने बांधले गेलो आहोत आणि एकाच विचारधाराने पूर्ण पक्ष चालतायत. राज ठाकरेंचे जे विचार आहेत, तेच शिवसेनेचे विचार आहेत. म्हणून शिवसेना मनसेचा डीएनए एकच आहे. त्यामुळे आम्हाला लगेच एकत्र येता आलं. आमदार राजू पाटील आणि आम्ही एकमेकांचा विरोध करत होतो. मात्र तो वैचारिक विरोध होता. मतभेद होते पण मनभेद नव्हते, असे श्रीकांत शिंदे यांनी सांगीतले.

आज १ मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात मनसेच्या वतीने पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं .या मेळाव्याला मनसे आमदार राजू पाटील मनसे नेते बाळा नांदगावकर आणि शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्रीकांत शिंदे यांनी काही लोकांनी विचारांशी स्वतःच्या स्वार्थासाठी खुर्चीसाठी या विचारांचे फारकत घेतली म्हणून उठाव झाला आणि पुन्हा महायुतीचा सरकार बनलं. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांची काय परिस्थिती होणार ते येत्या चार तारखेला दिसेल. चार तारखेला दूध का दूध पाणी का पाणी होईल. तुमच्याकडे सिमप्ती नाही, संपत्ती आहे, असा टोला श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी राज ठाकरे यांनी महायुतीला पूर्णपणे पाठिंबा दिला. ही युती जेव्हा झाली तेव्हा एका विचाराने झाले आणि त्या विचाराबरोबर जोडण्याचं काम हे राज ठाकरेंनी देखील केले. आता जेव्हा एका विचाराच्या पक्ष एकत्र आलेत. मला वाटतं जसं काम या दोन वर्षात झालं अजून चांगलं काम भविष्यामध्ये होत राहील. ही युती तात्पुरती नाही, तर महाराष्ट्राचे भविष्यासाठी ही भविष्यात देखील राहील, अशी कार्यकर्ता म्हणून अपेक्षा असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी राज ठाकरे यांनी अत्यंत विचारपूर्वक हा निर्णय घेतलाय: राजू पाटील

यावेळी बोलताना मनसे आमदार राजू पाटील म्हणाले, नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी राज ठाकरे यांनी अत्यंत विचारपूर्वक हा निर्णय घेतलाय. अख्खा महाराष्ट्र एका बाजूला आणि कल्याण लोकसभा एका बाजुला असेल. श्रीकांत शिंदे मनसेचे उमेदवार आहेत, असं समजून काम करायचं प्रत्येक वार्डात पक्ष दिसला पाहिजे, मतपेटीत दिसलं पाहिजे. ते नाही झालं तुमचं आमच्यावर प्रेम नाही, असं समजेन, असं भावनिक आवाहन राजू पाटील यांनी कार्यकर्त्यांना केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : शिंदे गटाला मोठा झटका, मोठ्या नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Maharashtra Live News Update: राधाकृष्ण विखे पाटील मनोज जरांगे यांच्या भेटीला अंतरवाली सराटीत दाखल

Khare Shankarpali Recipe : यंदा दिवाळीला खास बनवा खुसखुशीत खारी शंकरपाळी, फक्त १० मिनिटांत रेसिपी तयार

Crime News : मामाच्या मुलीचा लग्नाला नकार, तरुण कमालीचा संतापला, चवताळलेल्या भावानं बाजारपेठेतच रक्तरंजित खेळ केला

WPL: आयपीएल ऑक्शनमध्ये मोठा बदल; खेळाडू रिटेनबाबत BCCIनं फ्रँचायझींना पाठवली गाइडलाइन

SCROLL FOR NEXT