Loksabha Election: सांगलीत आज काँग्रेसचा मेळावा; बंडखोर विशाल पाटील यांच्यावर कारवाई होणार?
Nana Patole and Vishal PatilSaam Tv

Vishal Patil: अल्टिमेटम संपला तरी विशाल पाटील ठाम! काँग्रेस करणार कारवाई?

Sangli Lok Sabha constituency: सांगली लोकसभेत विशाल पाटलांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे मविआचे उमेदवार चंद्रहार पाटलांना पाठिंबा देण्याच्या सूचना दिल्या होत्या. यासाठी दिलेला अल्टीमेटम आज संपलाय.
Published on

Sangli Lok Sabha constituency:

सांगली लोकसभेत विशाल पाटलांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे मविआचे उमेदवार चंद्रहार पाटलांना पाठिंबा देण्याच्या सूचना दिल्या होत्या. यासाठी दिलेला अल्टीमेटम आज संपलाय. यातच काँग्रेस हायकमांड नाना पटोलेंना कारवाई करण्याच्या सूचना देतील, अशी शक्यता आहे. दरम्यान, शिवाजी वडेट्टीवारांना तातडीने नोटीस बजावणारी काँग्रेस विशाल पाटलांवर कारवाई करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय..

मुदत संपली, कारवाई कधी?

काँग्रेस हायकमांडने सांगलीची जागा ठाकरे गटाला दिल्यानंतर विशाल पाटलांनी विरोधाचं निशाण फडकवलं. ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटलांविरोधात अपक्ष उमेदवारी दाखल केली. बंडखोरीमुळे महाविकास आघाडीत बिघाडी होऊ नये यासाठी काँग्रेस हायकमांड प्रयत्नशील आहे. मात्र अल्टिमेटम देऊनही विशाल पाटलांनी माघार घेतलेली नाहीये.

दुसरीकडे काँग्रेसने शिवानी वडेट्टीवार यांना पक्षशिस्त मोडल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस पाठवलीय. पक्षाची काम न करता पद घेतल्यामुळे त्यांना कारवाईचा इशारा दिलाय.

दरम्यान, शिवानी वडेट्टीवार यांच्यावरील कारवाईनंतर विशाल पाटलांना वेगळा न्याय का? अशी विचारणा होतेय. सोबतच विशाल पाटलांच्या बंडखोरीला काँग्रेस नेत्यांचाच छुपा पाठिंबा असल्याचीही चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. या चर्चांना पूर्णविराम लावण्यासाठी आणि मविआची एकजूट टिकवण्यासाठी काँग्रेस हायकमांड काय निर्णय़ घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com