FACT CHECK: 'साम टीव्ही'चा लोगो वापरून प्रेक्षकांची दिशाभूल! कोल्हापूरमधील व्हायरल व्हिडिओमागचं सत्य नेमकं काय?

Kolhapur News: 'साम टीव्ही'चा व्हिडिओ असल्याचा दावा करत एक व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून प्रेक्षकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं साम टीव्हीच्या फॅक्ट चेक पडताळणीत समोर आलं आहे.
Kolhapur Viral Video Fact Check
Kolhapur Viral Video Fact CheckSaam Tv

Kolhapur Viral Video Fact Check:

'साम टीव्ही'चा व्हिडिओ असल्याचा दावा करत एक व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून प्रेक्षकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं साम टीव्हीच्या फॅक्ट चेक पडताळणीत समोर आलं आहे. हा व्हिडिओ नेमका कोणता आहे आणि हा व्हिडिओ कसा चुकीच्या पद्धतीने समोर आणण्यात आला आहे, तेच आपण या संपूर्ण बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत...

समोर आलेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. जो व्हायरल होत आहे. या व्हिडीओत 'साम टीव्ही'चा लोगो आणि ग्राफिक्सचा वापर करण्यात आला आहे. ते साफ चुकीचे आणि बेकायदेशीर आहे. तसेच हा व्हिडिओ 'कोल्हापूरच्या वारसदारांनी भोसले आडनाव बदलून छत्रपती का केलं?' असा आशय लिहित सोशल मीडियावर पब्लिश करण्यात आला आहे.

Kolhapur Viral Video Fact Check
Uddhav Thackaeray: भाजपने केलेल्या पाडापाडीचा सूड घेणार; इचलकरंजीत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

या व्हिडिओमध्ये कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याबद्दल चुकीची माहिती सांगण्यात आली आहे. तसेच व्हिडीओत ज्या मुलीचा व्हॉईस ओव्हर ऐकू येत आहे ती मुलगी साम टीव्हीची कर्मचारी नाही. चुकीची माहिती पसरवण्याच्या हेतूने हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे.

'साम टीव्हीने' या व्हिडीओची सत्यता पडताळणी केली असता व्हिडीओत अनेक ठिकाणी हेडर हिंदीमध्ये असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरही हा व्हिडीओ आणि व्हिडीओची लिंक शेअर केली जात आहे. तुम्हालाही व्हॉट्सअ‍ॅप मेसेजमध्ये हा व्हिडिओ आला असल्यास किंवा तुम्हाला फेसबुकवर तुमच्या वॉलवर हा व्हिडीओ दिसल्यास त्वरित फेसबुकवर याला 'रिपोर्ट' करा.

Kolhapur Viral Video Fact Check
Sudhir Mungantiwar: शिवरायांची वाघनखं आणण्यास विलंब का होतोय?, सुधीर मुनगंटीवारांनी सांगितलं कारण

दरम्यान, चुकीची माहिती पसरवणे हा कायद्याने गुन्हा आहे. कोणत्याही व्यक्ती, माध्यम आणि समूहाच्या नावाचा त्यांच्या संमतीशिवाय किंवा चुकीच्या पद्धतीने वापर करून खोटी माहिती पसरवणे हा गंभीर गुन्हा आहे. या प्रकरणी योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com