Uddhav Thackaeray: भाजपने केलेल्या पाडापाडीचा सूड घेणार; इचलकरंजीत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

Uddhav Thackaeray : उद्धव ठाकरेंनी इचलकरंजीत सत्यजित पाटील सरूडकर यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होतेय. शिंदे गटाचे धैर्यशील माने, शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे राजू शेट्टी यांना ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजीत पाटील टक्कर देत आहेत.
 Uddhav Thackaeray
Uddhav Thackaeray Saam Tv

Uddhav Thackaeray Rally In Kolhapur Ichalkaranji :

सत्यजित पाटील सरूडकर यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंनी इचलकरंजीत सभा घेतली. या जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. भाजपने राज्यात केलेल्या पाडापाडीचा सूड आपण घेणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होतेय. शिंदे गटाचे धैर्यशील माने, शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे राजू शेट्टी यांना ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजीत पाटील टक्कर देत आहेत. सत्यजित पाटील यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेना भाजपची युती असताना शिवसेनेच्या उमेदवारांना पाडण्यासाठी भाजपने कशी सेटींग केली होती हे सांगत आपण सूड घ्यायला आलो असल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत. 'पाडापाडीचे धंदे केले.मी सूड घ्यायला आलो आहे. तुम्हीदेखील सूड घेतला पाहिजे,असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

महाराष्ट्रात लोकसभेच्या प्रचार सभेत बोलताना पंतप्रधान मोदींना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हटलं होतं. पंतप्रधान मोदींच्या या टीकेला उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातील इचलकरंजीतील सभेत उत्तर दिलं. महाराष्ट्रविषयीचा आकस आत्ताचा नाहीये. हा आकस शिवाजी महाराज यांच्या काळापासून चालूय. मोरारजी देसाई यांनीरही महाराष्ट्राच्या आया भागिनींवर- गोळ्या झाडण्याचे आदेश दिले होते. आधी शिवाजी महाराज यांनी इंग्रजांची वखार असलेल्या सूरतची लूट केली होती, आता सुरतेचे दोन जण महाराष्ट्राची लटू करत आहेत.

माझ्या महाराष्ट्राची जे लूट करत आहेत, त्या लुटारूंचा मी सुफडासाप केल्याशिवाय राहणार नाही,अशी आपण शपथ घेतल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत. जे लोक महाराष्ट्राला लूटत आहेत, महाराष्ट्राला ओरबाडत आहेत मग ते कोणीही असो त्यांना मी नेस्तनाबूद करणार अशी शपथ आपण घेतल्याचं ठाकरे म्हणालेत.

पंतप्रधान मोदींना वेळीच आवारा टोला

माझा पक्ष फोडला, चिन्ह दुसऱ्याला दिलं त्यावर सर्वोच्च न्यायालयाने पक्षासंदर्भात कोणतीच निकाल दिला नाहीये.फक्त कुठे चुकलं कुठे नाही चुकलं हे सांगितलंय.पण पंतप्रधान पदावर बसलेले नरेंद्र मोदी हे माझ्या शिवसेना पक्षाला नकली सेना म्हणतो, म्हणजे ही तुमच्यावर दडपण आणतो, दबाव आणतो यामुळे या व्यक्तीला वेळीच आवरा,असं आवाहन उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टाला केलंय. हे दबावाचं राजकारण आहे. मध्यंतरी न्यायव्यवस्था सुद्धा हातात घेण्याचा प्रयत्न केला जात होता. मला अभिमान आहे सर्वोच्य न्यायालय हे विकल्या गेलं नाहीये. ते त्यांचं गुलाम नाहीय. न्यायमूर्तींवर भाजपकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोप यावेळी उद्धव ठाकरेंनी केला.

 Uddhav Thackaeray
Maharashtra Politics 2024 : 'ठाकरेंकडून संभाजीराजे छत्रपतींचा अपमान'; व्हिडीओ दाखवून उदय सामंतांचा खळबळजनक दावा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com