Raj Thackeray And PM Narendra Modi Saam Tv
लोकसभा २०२४

Raj Thackeray: राज ठाकरेंचा नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा, मोबदल्यात ठाकरेंना काय मिळणार? समोर आली माहिती

Lok Sabha Election 2024: पाडवा मेळाव्याच्या सभेतून मनसेप्रमुख राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा केली. बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरेंच्या पदरी काय पडलं? अशा राजकीय चर्चांना उधाण आलं होतं.

साम टिव्ही ब्युरो

Raj Thackeray:

पाडवा मेळाव्याच्या सभेतून मनसेप्रमुख राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा केली. बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरेंच्या पदरी काय पडलं? अशा राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. मात्र भाजपला पाठिंबा दिल्याचा मोबदला राज ठाकरेंना भविष्यात मिळणार असल्याची माहिती साम टीव्हीला भाजपमधील वरिष्ठ सूत्रांनी दिलीय.

'साम'ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे जर आधी चर्चेला आले असते, तर लोकसभेला जागा मिळाल्या असत्या. मात्र राज ठाकरेंसोबत अंतिम टप्प्यात चर्चा सुरु झाल्यामुळे त्यांच्या दृष्टीकोनातून बोलणी होऊ शकली नाही. म्हणूनच विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या पक्षाचा विचार केला जाणार असल्याची माहिती भाजपमधील खात्रीलायक वरिष्ठ सूत्रांनी दिलीय.

कधी मोदींविरोधात तर कधी मोदींसोबत अशा राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिकांमुळे मनसे नेत्यांची चांगलीच कोंडी झालीय. याच कोंडीतून मनसेत राजीनामासत्रही पाहायला मिळालं. दरम्यान राज ठाकरेंची हीच भूमिका मनसे कार्यकर्त्यांना पटते का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय. मोदींना पाठिंबा दिल्याचा मोबदला विधानसभा निवडणुकीत मिळेल, अशी आशा मनसे कार्यकर्त्यांना आहे.

राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश दिलेत. तोवर लोकसभेला महायुतीच्या उमेदवारांसाठी राज ठाकरे सभा घेणार आहेत. मात्र राज ठाकरेंच्या सभांना होणारी अलोट गर्दी मतांच्या रुपात महायुतीच्या उमेदवारांना मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : धक्कादायक! ड्रेनेज लाइनमध्ये उतरलेल्या ३ कामगारांचा मृत्यू, पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ

Pune Traffic: पुण्यातील वाहतूक कोंडी सुटणार! पालिका तयार करणार ३० मिसिंग लिंक; कुठून- कुठपर्यंत, कसा आहे प्लान?

Palasdari Tourism : पावसात खुलणार पळसदरीचे सौंदर्य; हे Top 7 धबधबे नक्की पहा

Pranjal Khewalkar : महिलेशी संबंध ठेवले, चोरून व्हिडिओही काढला अन्...; प्रांजल खेवलकरांचा पाय अजून खोलात|VIDEO

Maharashtra Live Update: बुलढाण्यातील जलसमाधी आंदोलन करणारे दोन आंदोलक वाहून गेले

SCROLL FOR NEXT