Amit Shah: राहुल गांधींनी कलम 370 हटवण्यास विरोध केला होता, अमित शाहांनी सांगितली संसदेतील ती घटना

Amit Shah On Rahul Gandhi: गेल्या १० वर्षात मोदीजींनी देशाच्या विकासासाठी खूप काम केले आहे.. मोदीजींच्या नेतृत्वाखाली अयोध्येत भगवान श्री रामाचे भव्य मंदिर बांधले गेले: अमित शाह
राहुल गांधींनी कलम 370 हटवण्यास विरोध केला होता, अमित शाहांनी सांगितली संसदेतील ती घटना
Amit Shah On Rahul GandhiSaam Tv
Published On

Amit Shah On Rahul Gandhi:

''मी संसदेत ३७० रद्द करण्यासाठी विधेयक मांडत असताना राहुल गांधी मला म्हणाले, कलम ३७० हटवू नका. मी त्यांना विचारलं का, तर ते म्हणाले, असं केल्यास रक्तपात होऊ शकतो. मात्र आज पाच वर्षे झाली आणि काश्मीरमध्ये शांतता नांदत आहे. दगडफेक करण्याचे धाडसही कोणी केले नाही'', असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

आज अमरावतीमध्ये नवनीत राणा आणि रामदास तडस यांच्यासाठी आयोजित प्रचार सभेत ते असं म्हणाले आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ''गेल्या १० वर्षात मोदीजींनी देशाच्या विकासासाठी खूप काम केले आहे.. मोदीजींच्या नेतृत्वाखाली अयोध्येत भगवान श्री रामाचे भव्य मंदिर बांधले गेले. बनारसमधील काशी विश्वनाथ मंदिराचा कॉरिडॉर बांधण्याचे काम केले. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्यात आलं.''

राहुल गांधींनी कलम 370 हटवण्यास विरोध केला होता, अमित शाहांनी सांगितली संसदेतील ती घटना
Maharashtra Politics: वंचितमुळे भाजप आणि मोदींना फायदा होत आहे: पृथ्वीराज चव्हाण

काँग्रेसवर हल्लाबोल करत ते म्हणाले,''निवडणुकीत भाजपने ४०० जागा जिंकल्या तर आरक्षण हटवले जाईल, असा दावा करत काँग्रेस खोटारडेपणा पसरवत आहे. मी स्पष्ट करतो की भाजप आरक्षण रद्द करणार नाही आणि करू देणारही नाही. ही मोदींची गॅरंटी आहे. या देशातील जनतेने आम्हाला संविधानात दुरुस्ती करण्याचा अधिकार दिला.''

उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत शाह म्हणाले, ''येथे उमेश कोल्हे यांची हत्या झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी काही केलं नाही. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे सगळे संस्कार सोडलेत. आमचे एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे संस्कार घेऊन पुढे वाढत आहेत. महाराष्ट्रात आता आमचं सरकार आहे, आता नेत्यानी उमेशची हत्या होऊ शकत नाही.''

राहुल गांधींनी कलम 370 हटवण्यास विरोध केला होता, अमित शाहांनी सांगितली संसदेतील ती घटना
Nitin Gadkari Health : नितीन गडकरींना प्रचारसभेतच भोवळ; बरं वाटताच काही वेळानं पुन्हा त्याच स्टेजवर भाषण, VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com