Raj Thackeray Saam Digital
लोकसभा २०२४

Raj Thackeray MNS : 18 वर्षांत मनसेच्या 'इंजिन'ने बदलले 6 ट्रॅक; सविस्तर आढावा...

Sandeep Gawade

Raj Thackeray Politics :

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पाडव्याच्या सभेतून मोदींना बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. मात्र राज ठाकरेंच्या सतत बदलत्या भूमिकांमुळे मनसे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिकांचा पहिला फटका डोंबिवलीतून बसलाय. राज ठाकरेंची भूमिका अनाकलनीय असल्याचं म्हणत मनसेचे सरचिटणीस कीर्तीकुमार शिंदे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे.

'महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजप- शिवसेना- राष्ट्रवादी'च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे. आम्हाला राज्यसभा नको, विधानपरिषद नको, बाकीच्या वाटाघाटी नको. हा पाठिंबा फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे..' अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात या शब्दांत आपली भूमिका मांडली आणि त्यांच्या राजकीय भूमिकांचं एक 'अनाकलनीय' वर्तुळ पूर्ण झालं, असं परख़ड मत किर्तीकुमार शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केलंय. मनसेच्या स्थापनेपासून गेल्या 18 वर्षांत 6 वेळा राज ठाकरेंनी इंजिनाचा ट्रॅक बदलला आहे.

मनसेच्या 'इंजिन'चे 18 वर्षांत सहा ट्रॅक..

- पक्षस्थापनेनंतर 2009 च्या पहिल्याच निवडणुकीत राज ठाकरेंनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला.

- यावेळी मनसेचा लोकसभेला एकही उमेदवार निवडून आला नाही.. मात्र विधानसभेला 13 आमदार निवडून आले..

- 14 च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला.. आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढली..

- यावेळी विधानसभेला मनसेने लढवलेल्या 219 जागांपैकी फक्त एका जागेवर विजय मिळाला..

- 2019 च्या लोसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी लाव रे तो व्हिडिओ म्हणत मोदींविरोधात प्रचार केला..

- तर विधानसभेला 101 उमेदवार उभे केले.. मात्र कल्याणमधून राजू पाटील हे एकमेव आमदार विजयी झाले..

- आता पुन्हा 2024ला राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिलाय..

- मात्र एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना पाठिंबा आहे की नाही याबाबत संभ्रम आहे..

राज ठाकरेंची हीच भूमिका कार्यकर्त्यांना पटणं दूर राहिलं, आधी ती कळतेय की नाही हाच मोठा प्रश्न आहे. कार्यकर्त्यांनी राज ठाकरे म्हणतील तीच पूर्व दिशा म्हटलं, तरी या भूमिकेचा महायुतीला कितपत फायदा होणार हेही पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

Maharashtra Politics : गुहाटीवरून परतलेल्या ठाकरेंच्या शिल्लेदाराच्या मतदारसंघात काय घडतंय? वंचित'चं ठरलं, महायुतीत रस्सीखेच सुरूच

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT