Maharashtra Politics 2024: यांचं मी शत्रुत्व पाहिलं अन् आता...; अजित पवार विजय शिवतारेंना भर सभेत असं का म्हणाले?

Lok Sabha Election 2024 : बारामतीत शरद पवार गट आणि अजित पवार गट लोकसभा निवडणुकीत आमने-सामने आले आहेत. या संधीचा फायदा घेण्यासाठी विजय शिवतारे यांनी निवडणूक लढण्याचा निर्धार केला होता. तेच शिवतारे सुनेत्रा पवार यांच्या बारामतीतील प्रचारसभेला मंचावर उपस्थित होते.
Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024Saam Digital

Maharashtra Politics 2024

बारामतीत शरद पवार गट आणि अजित पवार गट लोकसभा निवडणुकीत आमने सामने आले आहेत. या संधीचा फायदा घेण्यासाठी विजय शिवतारे यांनी निवडणूक लढण्याचा निर्धार केला होता. थेट पवार कुटुंबावर आरोप केले होते. तेच शिवतारे सुनेत्रा पवार यांच्या बारामतीतील प्रचारसभेला मंचावर उपस्थित होते. यावळी अजित पवारांनी, राजकीय जीवनात कोणीच कोणाचा कायमचा दुश्मन किंवा मित्र नसतो, असं म्हणत शिवतारे यांचं मी शत्रुत्व पाहिलं आहे आणि त्यांनी मला मैत्री काय असते हे सांगितलं असल्यांच सांगितलं.

शिवतारेंनी का बदलली भूमिका?

शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यातील वाद मिटल्यानंतर आज हे दोन्ही नेते एकाच मंचावर आले. सासवड (Saswad) येथील महायुतीचा शेतकरी जनसंवाद मेळाव्याला या नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील मंचावर उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये विजय शिवतारे यांनी त्यांचा निर्णय बदलण्यामागचे कारण सांगितले आहे. 'पाठीमागे हटायचं नाही हा माझा स्वभाव. पण याला मी छेद दिला.' असल्याचे विजय शिवतारे यांनी यावेळी सांगितले.

विजय शिवतारे यांनी सांगितले की, 'मला बोललं जात होतं की आपण काहीतरी केलं पाहिजे. सर्व मीडिया जिथे मी असेल तिथं होता. माझं लॉजिक ठीक होतं पण आता जाऊद्या. लोकांना प्रचंड उत्साह होता. अनेक जण माझ्यापाठीशी उभे राहिले. २ वेळा मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाली. पण माझं मन तयार नव्हतं. दादा मुख्यमंत्री यांच्याशी बोलत होते. कुठल्या ही प्रकारे लढायचं असा निश्चय मी केला होता. आयुष्याची लढाई आरपार लढायची तयारी केली होती.

Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024 : शरद पवारांचा भाजपला धक्का; माढातून धैर्यशील मोहिते पाटलांना उतरवंल रिंगणात?

विजय शिवतारे यांनी यावेळी निर्णय बदलण्यामागचे कारण सांगितले,'आज विश्वास वाटणार नाही देवाने या शिवतरेला खूप आशीर्वाद दिला. पाठीमागे हटायच नाही हा माझा स्वभाव पण याला मी छेद दिला. मला एक फोन आला की तुम्ही उभे राहिलात तर महायुतीला अडचण होईल. इथे सुनेत्रा पवार उमेदवार आहेत. पण खरे उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. मी निर्णय बदलला. मुख्यमंत्रीसाहेब मला कुठली ही भीती नाही. अजित पवार यांना सेट बॅक नको म्हणून मी हा निर्णय घेतला. माझ्यावर अनेक टीका केल्या गेल्या.'

Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024 : साताऱ्यात शशिकांत शिंदेंनी ठोकला शड्डू; पवारांचा मल्ल उदयनराजेंना भारी पडणार का?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com