Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024Saam Digital

Maharashtra Politics 2024 : शरद पवारांचा भाजपला धक्का; माढातून धैर्यशील मोहिते पाटील रिंगणात?

Lok Sabha Election 2024 : माढा लोकसभा मतदारसंघात आता रणजीतसिंह निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील असा थेट सामना होणार आहे. दोन दिवसांत धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करत तुतारी हातात घेणार आहेत.

Maharashtra Politics 2024

माढा लोकसभा मतदारसंघात आता रणजीतसिंह निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील असा थेट सामना होणार आहे. दोन दिवसांत धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करत तुतारी हातात घेणार आहेत. तर 16 एप्रिलला धैर्यशील मोहिते शरद पवार गटाकडून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यामुळे माढ्यात रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील असा धुरळा उडणार आहे.

माढा लोकसभेच्या रिंगणात एका बाजुला खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे आहेत. तर दुसरीकडे विजयसिंह मोहिते पाटील, रामराजे नाईक निंबाळकर या मातब्बर नेत्यांसह धैर्यशील मोहिते पाटील, आमदार दीपक चव्हाण, नुकतेच शिंदे गटाची साथ सोडणारे आमदार संजय कोकाटे आहेत. मोहिते पाटील घराण्याची नाराजी हेरून शरद पवारांनी भाजपला जोरदार धक्का दिला आहे. मात्र रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचाच विजय होईल असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.

Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024 : साताऱ्यात शशिकांत शिंदेंनी ठोकला शड्डू; पवारांचा मल्ल उदयनराजेंना भारी पडणार का?

भाजपने रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील नाराज होते. याच नाराजीतून दिलीप मोहीते पाटील यांनी माढ्यातील सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा करून पाठिंबा मिळवला होता. एकंदरीत माढा लोकसभेच्या रिंगणात धैर्यशील मोहिते पाटलांची एन्ट्री झाल्यानं निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे त्यामुळे माढ्याचं मैदान कोण मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Maharashtra Politics 2024
Raj Thackeray : राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिकांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम; भाजपला पाठिंबा देताच डोंबिवलीत बसला पहिला फटका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com