Lok Sabha Election 2024 Saam TV
लोकसभा २०२४

Lok Sabha Election 2024 : निकाल जाहीर होण्याआधीच शिंदे गटाची बॅनरबाजी; पुणे - मुंबई एक्स्प्रेस वेवर राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदेंच्या विजयाचे बॅनर

Ruchika Jadhav

सुनिल काळे, साम टीव्ही

पुणे - मुंबई एक्स्प्रेस वेवर राहुल शेवाळे आणि श्रीकांत शिंदेंच्या विजयाचे बॅनर झळकले आहेत. उर्से टोल नाका तळेगाव दाभाडे येथे शिंदे समर्थकांची पोस्टरबाजी केली आहे. राहुल शेवाळे आणि श्रीकांत शिंदे यांना खासदार झाल्याच्या शुभेच्छा यातून देण्यात आल्या आहेत. निकाल लागण्याआधीच निवडणूक जिंकल्याची पोस्टरबाजी शिंदे गटाकडून सुरू झालीये.

अधिक माहिती अशी की, तुषार सोनवणे यांनी हे बॅनर लावले आहे. बॅनरवर दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांचे नाव आणि फोटो छापण्यात आला आहे. दोन्ही उमेदवरांचे नाव आणि फोटोसमोर तुषार सोनवणे यांनी स्वत:चा फोटो आणि नाव लिहिलत अभिनंदन केलं आहे.

राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्रात ५ टप्प्यांतील मतदान झाले असून ४ जून रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. मात्र त्याआधील अनेक उमेदवारांच्या विजयाचे पोस्टर चौका-चौकात झळकताना दिसत आहेत.

काल पुणे सातारा महामार्गावर शिंदेवाडी गावाच्या हद्दीत निकाला आधीच महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर लावण्यात आले होते. शिवसेना ठाकरे गटाचे भोर तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर शिंदे यांनी हे बॅनर लावले होते.

सुप्रिया सुळे यांची बारामती लोकसभा खासदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, गुलाल आपलाच.."कोण म्हणतोय येत नाय, आल्याशिवाय राहत नाय", अशा आशयाचा मजकूर बॅनरवर लिहिण्यात आला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

SCROLL FOR NEXT