राहुल गांधी यांनी सोलापुरच्या सभेतून मोठी घोषणा केली आहे. कॉंग्रेसच सरकार केंद्रात सत्तेत आल्यानंतर देशातील प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात वर्षाला एक लाख रुपये जमा करण्यात येणार आहेत. महालक्ष्मी योजनेंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार आहे. दर महिन्याला काही रक्कम खात्यात जमा केली जाईल. तसंच अगणवाडी आणि आशा कार्यकर्त्यांचं वेतन दुप्पट केलं जाईल, तसंच सरकारी नोकरीत महिलांना ५० टक्के जागा राखीव ठेवल्यात जातील, असं आश्वासन राहुल गांधींनी दिलं. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवरही सडकून टीका केली.
भारताच्या संविधानाला संपवण्याचं लक्ष्य भाजपचं आहे, मात्र इंडिया आघाडी लोकतंत्र वाचवण्यासाठी एकत्र आली आहे. दलित - आदिवासींना संविधानामुळे हक्क मिळाले आहेत. या लोकांनी संविधान संपावलं तर गरिबांसाठी काही नाही उरणार नाही. मात्र जगात जगात अशी कोणतीच शक्ती नाही, जीं भारताच्या संविधानाला बदलू शकेल.
नरेंद्र मोदींनी सगळ्यात श्रीमंत 22 ते 25 लोकांना 16 लाख करोड रुपये दिले आहेत. जेवढा पैसा मनरेगाला 24 वर्ष लागतो तेवढा पैसा मोदींनी 25 जणांना दिलाय. 70 कोटी लोकांजवळ जेवढा पैसा तेवढाच २२ लोकांजवळ आहे. सामान्य नागरिकांची कमाई हजारांची आहे आणि उद्यागपतींची करोडोत, अशी घणाघाती टीका त्यांनी नरेंद्र मोदींवर केली. मात्र काँग्रेस करोडो लाखपती बनवणार, असल्याचं त्यांनी आश्वासन दिलं.
निवडणूकीनंतर कोट्यवधी भारतीय लखपती बनवणार, महिला लखपती बनवणार. काँग्रेस महालक्ष्मी योजना आणणार आहे. या योजनेतून भारतातील सर्व गरीब परिवाराची लिस्ट बनेल. त्या लिस्टमधून प्रत्येक परिवारातून एक महिला निवडली जाईल आणि दर महिन्याला ८५०० रुपये असे वर्षाला १ लाख रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातील, अशी घोषणा राहुल गांधींनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.