Rahul Gandhi Saam Tv
लोकसभा २०२४

Lok Sabha Election: काँग्रेसचं सरकार स्थापन झाल्यास आर्थिक सर्वेक्षण करणार, राहुल गांधी यांची घोषणा

Rahul Gandhi News: केंद्रात काँग्रेसचं सरकार स्थापन झाल्यास संपूर्ण देशात प्राधान्याने जात आणि आर्थिक सर्वेक्षण केलं जाईल, अशी घोषणा काँग्रेसचे नेते राहुल यांनी केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Lok Sabha Election 2024:

केंद्रात काँग्रेसचं सरकार स्थापन झाल्यास संपूर्ण देशात प्राधान्याने जात आणि आर्थिक सर्वेक्षण केलं जाईल, अशी घोषणा काँग्रेसचे नेते राहुल यांनी केली आहे. गुजरातमधील पाटण शहरात एका प्रचार सभेला संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली आहे.

राहुल गांधी म्हणाले आहेत की, देशातील 90 टक्के लोकसंख्या एससी, एसटी आणि ओबीसींची आहे. मात्र त्यांना कॉर्पोरेट, मीडिया, खाजगी रुग्णालये, खाजगी विद्यापीठे किंवा सरकारी नोकरशाहीमध्ये योग्य प्रतिनिधित्व मिळत नाही.

भाजप आणि आरएसएस संविधान बदलण्याचा कट रचत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच एनडीए सरकार आरक्षणाच्या विरोधात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ते म्हणाले आहेत की, आरक्षण म्हणजे गरीब, आदिवासी, दलित आणि मागासलेल्या लोकांची समाजात न्यायपूर्ण भागीदारी आहे. खासगीकरणाला शस्त्र बनवून नरेंद्र मोदींना तुमच्याकडून हा अधिकार हिसकावून घ्यायचा आहे. सत्तेत आल्यानंतर सर्वातआधी जात आणि आर्थिक सर्वेक्षण करू.

राहुल गांधी म्हणाले की, भारतातील 40 टक्के संपत्तीवर केवळ 1 टक्के लोकांचे नियंत्रण आहे. हे देशाचे सत्य आहे. यातच नरेंद्र मोदी आणि भाजपचे लोक आरक्षण संपवू, असे म्हणतात. अग्निवीर, खाजगीकरण यासारख्या गोष्टी आरक्षण संपवण्याचे मार्ग आहेत. सध्या दोन विचारधारांमध्ये लढा सुरू आहे. एकीकडे काँग्रेस आणि इंडिया आघाडी आहे, जे संविधान वाचवण्याचं काम करत आहेत. दुसऱ्या बाजूला मोदी आणि आरएसएस आहेत, जे संविधान बदलण्याचा कट रचत आहेत.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, सध्या दोन भारत निर्माण होत आहेत. तुम्ही राम मंदिराचे उद्घाटन पाहिले, ज्यात श्रीमंत लोक दिसले. पण एकही गरीब, शेतकरी, मजूर नव्हता. आदिवासी समाजातून येणाऱ्या राष्ट्रपतींनाही तिथे जाण्यास मज्जाव करण्यात आला. हे लाजिरवाणे आहे. देशात एक नाटक सुरू आहे आणि अदानी पैसे कमवत आहेत. आमचे सरकार झाले तर आम्ही अग्निवीर योजना रद्द करू. काँग्रेस महालक्ष्मी योजना आणणार आहे. ज्याद्वारे प्रत्येक गरीब कुटुंबातील एका महिलेला दरवर्षी 1 लाख रुपये दिले जाणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident: खेडमधील पिकअप अपघातातील ९ मृतांची नावं आली समोर, पापळवाडी गावावर शोककळा

Asia Cup 2025 India Squad: श्रेयस अय्यर पास; हार्दिक पांड्या वेटिंगवर तर सूर्या दादाबाबत सस्पेन्स

Janhvi Kapoor: परम सुंदरीचा नविन फ्लॉरल साडी लूक पाहिलात का?

बनावट शाळा आयडी प्रकरणात कारवाईचा धडाका; हजारो लाडक्या शिक्षक रडारवर|VIDEO

Maharashtra Live News Update: मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी केवळ ऑनलाइनच नोंदणी

SCROLL FOR NEXT