सागर आव्हाड, साम टीव्ही प्रतिनिधी
पुणे : लोकसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारांसाठी प्रचारसभांचा धडका लावला आहे. या लोकसभा निवडणुकीत भाजपने ३७० तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) ४०० पारचा नारा दिला आहे. भाजपच्या जागा जिंकण्याच्या दाव्यावर प्रकाश आंबेडकरांनी मोठं भाष्य केलं आहे. 'आता असणारा सर्व्हे भाजपच्या जागा ३०० पेक्षा कमी आहेत, असा अंदाज प्रकाश आंबेडकरांनी सांगितला आहे.
प्रकाश आंबेडकरांनी पुण्यात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांच्या प्रचारार्थ पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजप आणि इंडिया आघाडीवर भाष्य केलं. 'मोदींच्या सभेत १० ते १५ मिनिटानंतर लोक उठून जातात. शासनाने कबुल केले की, १७ लाख कुटुंबांनी भारत सोडला आहे. ते विदेशात जाऊन बसले आहेत. या सर्व कुटुंबावर इलेक्टोरल बॉण्डची सक्ती केली होती का? असा प्रश्न आहे. नागरिकत्व सोडलेले सगळे हिंदू आहेत. २०१४ साली मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशावरील कर्ज वाढले, असे ते पुढे म्हणाले.
'निर्मला सीताराम यांचे पती म्हणाले की, मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर लोकशाही संपेल. निवडणुका होणार नाहीत. संविधान संपेल, गलोगल्ली तुम्हाला मणिपूर दिसेल. या बाबी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे या गोष्टी समोर आणायला अपयशी ठरले आहेत. आम्ही आमचं लोकसभेचे खात नक्की उघडू, असा दावा आंबेडकरांनी केला.
'भाजपला मागील निवडणुकीत लाख ते दीड लाखांची लीड मिळत होती. त्यामुळे ते जिंकत होते. २०१४ नवीन मतदारांना 2G घोटाळ्याचा राग, डिझेल आणि पेट्रोलचे भाव वाढलेले म्हणून चीड होती. २०१९ पर्यंत हा मतदार सोबत राहिला. २०२४ मध्ये हा मतदार त्यांच्याकडे दिसत नाही. ७० टक्के होणारे मतदान आता 54-55 टक्क्यांपर्यंत आलंय. 10-12 टक्के मतदार मतदान करायला तयार नाही, त्याचा परिणाम भाजपला भोगावा लागणार आहे, असे आंबेडकर यांनी सांगितले.
'माझी कोणतीही चौकशी सुरु नाही. सोनिया गांधी, राहुल गांधी, खरगे यांची चौकशी सुरु आहे. त्यामुळे त्यांना जेलमध्ये जाण्यापासून वाचायचं आहे. मला तुरुंगात जायचं नाही, असा टोला प्रकाश आंबेडकरांनी लगावला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.