'काँग्रेसला ६० वर्षांत मुलभूत सुविधाही देता आल्या नाही. मोदी सरकारने १० वर्षांत या मुलभूत सुविधा दिल्या.', असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सभेतून काँग्रेसवर निशाणा साधला. या सभेमध्ये पुणेकरांशी संवाद साधताना पीएम मोदींनी १० वर्षांच्या कार्यकाळात मोदी सरकारने देशासाठी केलेल्या कामाचा पाढा वाचून दाखवला. यावेळी त्यांनी काँग्रेस सरकार आणि इंडिया आघाडीवर टीका केली. पुण्यातील रेसकोर्स मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. लोकसभा निवडणुकीच्या पार्वभूमीवर महायुतीचे चार मतदार संघातील उमेदारांच्या प्रचारार्थ पीएम मोदींची ही सभा पुण्यात पार पडली.
पुण्यातील सभेत बोलताना पीएम मोदींनी आपल्या भाषणाची सुरूवात मराठीतून केली. या सभेत काँग्रेसवर टीका करताना पीएम मोदींनी सांगितले की, 'काँग्रेसने देशात ६० वर्षांपर्यंत राज्य केले. काँग्रेसच्या राज्यात देशातील अर्ध्या लोकसंख्येकडे मुलभूत सुविधा नव्हत्या. आता आम्हाला फक्त १० वर्षांत आपली सेवा करण्याची संधी मिळाली. या १० वर्षांत मुलभूत आवश्यकतांना पूर्ण केलेच त्यासोबच प्रत्येक वर्गातील आकांशाला पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला. आवश्यकता आणि आकांशा दोघांच्या पूर्तीसाठी एक व्हिजन घेऊन आम्ही आलो.'
'काँग्रेसने १० वर्षांत मुलभूत सुविधांवर जेवढा खर्च केला. तेवढा खर्च आम्ही एका वर्षांत मुलभूत सुविधांसाठी केला.', अशी टीका पीएम मोदींनी केली. तसंच, 'मोदी सरकारने या १० वर्षांच्या काळात देशात सव्वा लाखांपेक्षा जास्त स्टार्टअप सुरू केले. प्रत्येक क्षेत्रात भारताची प्रगती झाली आहे. भारताला सेमी कंडक्टर हब बनवणार आहोत. १० वर्षांपूर्वी भारत मोबाईल फोन आयात करत होता. २०१४ पूर्वी आपण मोबाईल फोन आयात करत होतो. १० वर्षांत आज आपण जगात मोबाईल फोनचे दुसरे सर्वात मोठे निर्यातदार बनलो.', असे मोदींनी सांगितले.
पीएम मोदींनी यावेळी राहुल गांधी यांच्या घोषणापत्रावर देखील टीका केली. 'काँग्रेसच्या राजकुमारला काहीही विचारले तर त्याचे उत्तर खटाखट आणि टकाटक हेच असते.' अशी टीका त्यांनी केली. पीएम मोदींनी पुढे सांगितले की, '२०१४ नंतर महागाईवर आम्ही नियंत्रण मिळवले. आमचं सरकार येताच भ्रष्टाचाराला चाप बसला. आज भ्रष्टाचारींमध्ये खळबळ उडाली आहे.' तसंच, देशातील ७० वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीच्या उपाचाराचा खर्च मोदी सरकार करणार असल्याची मोठी घोषणा पीएम मोदींनी केली.
पीएम मोदींनी यावेळी शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. 'काही भटकते आत्मा असतात. ज्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या नाहीत. ते महाराष्ट्र देखील अशा भटकत्या आत्माचा शिकार झाला. ४५ वर्षांपुर्वी एका नेत्याने याची सुरुवात केली. ही आत्मा आपल्या पार्टीत अस्थिरता आणते. एवढंच नाही घरात ही अस्थिरता आणते. या आत्म्याने १९९५ मध्ये युती सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला होता. आता देश पातळीवर हा खेळ करण्याचा प्रयत्न सुरु आहे.'
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.