Vasant More Election symbol : झोप उडवणार! वसंत मोरेंना निवडणूक चिन्ह मिळताच विरोधकांना दिला थेट इशारा

Pune Loksabha Election : आज निवडणूक आयोगाकडून (Election Commission) वसंत मोरे यांना निवडणूक लढवण्यासाठी चिन्ह बहाल करण्यात आले. निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत विरोधकांना इशारा दिला आहे.
Vasant More Election symbol
Vasant More Election symbol Saam Tv

अक्षय बडवे, पुणे

लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) पुण्यातून वंचित बहुजन आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या वसंत मोरे (Vasant More) यांना आज निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. वसंत मोरे यांना 'रोड रोलर' हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. आज निवडणूक आयोगाकडून (Election Commission) वसंत मोरे यांना निवडणूक लढवण्यासाठी चिन्ह बहाल करण्यात आले. निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत विरोधकांना इशारा दिला आहे. त्यांची ही सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहे.

मनसेला जय महाराष्ट्र करत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेले वसंत मोरे हे लोकसभा निवडणुकीसाठी पुणे लोकसभा मतदार संघातून उभे राहिले आहेत. वसंत मोरे यांना आज रोड रोलर हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. रोड रोलरच्या माध्यमातून वसंत मोरे हे लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. वसंत मोरे यांनी निवडणूक चिन्हाचा फोटो आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

Vasant More Election symbol
Pune PM Narendra Modi Rally: ६० वर्षांत काँग्रेसला जे करता आलं नाही ते आम्ही केलं, PM मोदींचा पुण्यातून हल्लाबोल

वसंत मोरे यांनी एक्सवर निवडणूक चिन्हाची पोस्ट शेअर केली आहे. रोड रोलर निवडणूक चिन्हाच्या फोटोवर 'पुण्याची पसंत मोरे वसंत...' असे लिहिले आहे. त्यांनी ही पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये 'पुण्यात आता वसंत (तात्या) मोरे यांचा विकासाचा रोडरोलर प्रस्थापितांची झोप उडवणार…' असे लिहिले आहे. या पोस्टच्या माध्यमातून वसंत मोरे यांनी विरोधकांना थेट इशारा दिला आहे.

Vasant More Election symbol
Narendra Modi : निवडणुकीत बहुमत संविधान बदलण्यासाठी हवंय का? काँग्रेसच्या आरोपांना PM मोदींकडून उत्तर, म्हणाले...

दरम्यान, पुण्यात लोकसभा निवडणुकीमध्ये तिहेरी लढत होणार आहे. महायुतीकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे नेते रविंद्र धंगेकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उभे करण्यात आले आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. अशामध्ये आज मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Vasant More Election symbol
Arvind Kejariwal: अरविंद केजरीवाल तपासत सहकार्य करत नाहीत, ईडीची सुप्रीम कोर्टाकडे तक्रार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com