Ravindra Dhangekar On PM Modi: पुणेकरांचा पैसा प्रचारासाठी वापरला, आचारसंहिता भंग केली; मोदींच्या सभेवर रविंद्र धंगेकरांचा आक्षेप

Pune Narendra Modi Rally: पीएम मोदींच्या दौऱ्यानिमित्त पुण्यात जोरदार तयारी करण्यात आली आहे. अशामध्ये पीएम मोदींच्या या दौऱ्यावरून महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी जोरदार टीका केली आहे.
Ravindra Dhangekar And PM Modi
Ravindra Dhangekar And PM Modi Saam tv

सचिन जाधव, पुणे

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha election 2024) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची पुण्यामध्ये आज जाहीर सभा होणार आहे. महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या प्रचारार्थ पीएम मोदींची पुण्यातील रेसकोर्समध्ये ही सभा होणार आहे.

पीएम मोदींच्या दौऱ्यानिमित्त पुण्यात जोरदार तयारी करण्यात आली आहे. अशामध्ये पीएम मोदींच्या या दौऱ्यावरून महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी जोरदार टीका केली आहे. 'पुणेकरांचा पैसा प्रचारासाठी वापरला असून आचारसंहिता भंग केला.', असल्याचा आरोप रविंद्र धंगेकर यांनी केला आहे.

https://www.youtube.com/watch?v=ACwYlTRTvLcपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुण्यातील सभेपूर्वी रविंद्र धंगेकर आक्रमक झाले आहेत. रविंद्र धंगेकर यांनी पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधताना भाजप सरकारच्या १० वर्षांच्या कार्यकाळातील लेखाजोखा मांडला. 'मोदीच्या सभेला पुणेकर उत्तर देतील.', असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेवर रवींद्र धंगेकरांनी आक्षेप घेतला आहे. 'पालिकेच्या लोकांना कामाला लावून आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करत त्यांनी याबाबत तक्रार देणार असल्याचे सांगितले.

Ravindra Dhangekar And PM Modi
Shirur Loksabha Election: अमोल कोल्हे-आढळराव पाटील दोघेही एकमेकांच्या पडले पाया, पाहा व्हिडीओ

रविंद्र धंगेकर यांनी पुणेकरांचा पैसा प्रचारासाठी वापरत असल्याचा आरोप केला. तसंच, १० वर्षांत पुणेकरांवर आश्वासनांची खैरात केली. ४०० रुपयांचा गॅस ११०० रुपयांवर, ७० रुपयांचे पेट्रोल ११० रुपयांत. १० वर्षांत फक्त मुरलीधर मोहोळांच्याच संपत्तीत वाढ झाली. खर तर मोदींनी मुरलीधर मोहोळ यांनाच ईडी लावायला हवी होती.' असे वक्तव्य त्यांनी केले आहे. तसंच, 'नरेंद्र मोदी भाषण करतात की कॉमेडी कळतच नाही.', अशी देखील टीका त्यांनी केली आहे.

Ravindra Dhangekar And PM Modi
Pune Traffic diversion for PM Modi rally : PM मोदींची आज पुण्यात सभा, शहरातील अनेक रस्ते राहणार बंद; वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कोणते?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com