Priyanka Gandhi  saam tv
लोकसभा २०२४

Priyanka Gandhi: पीएम मोदींनंतर प्रियंका गांधींची पुण्यात होणार मोठी सभा, ४ लोकसभा मतदारसंघांचा करणार दौरा

Priyanka Gandhi Pune Rally: मोदींच्या सभेनंतर काँग्रेसच्या स्टार प्रचारक प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) या देखील पुणे दौऱ्यावर येणार आहेत. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ते पुणे दौरा करण्याची शक्यता आहे.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार सभा, रॅली आणि बैठका सुरू आहेत. राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांच्या प्रचारसभा होत आहेत. या महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुणे दौऱ्यावर येणार आहेत. ४० उमेदवारांच्या प्रचारासाठी ते पुण्यात सभा घेणार आहेत. मोदींच्या सभेनंतर काँग्रेसच्या स्टार प्रचारक प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) या देखील पुणे दौऱ्यावर येणार आहेत. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ते पुणे दौरा करण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांका गांधी लवकरच पुणे दौरा करणार आहेत. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रियांका गांधी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर काहीच दिवसांत काँग्रेसकडून पुण्यात रॅली आणि सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुणे जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीच्या समर्थनार्थ प्रियांका गांधी यांचा दौरा असणार आहे. काँग्रेसच्या स्टार प्रचारक प्रियांका गांधी यांच्यासह सचिन पायलट हे देखील त्यांच्यासोबत सभेला उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी २९ एप्रिल रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. ४० लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदींची पुण्यामध्ये भव्य सभा होणार आहे. पीएम मोदींच्या या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. अशामध्ये आज काँग्रेसच्या स्टार प्रचारक प्रियांका गांधी या देखील पुणे दौऱ्यावर येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, पंतप्रधानांच्या सभेनंतर अवघ्या काही दिवसांतच काँग्रेसच्या स्टार प्रचारक प्रियांका गांधी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक बडे नेते देखील सभेला हजेरी लावणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी केवळ ऑनलाइनच नोंदणी

Independence Day: स्वातंत्र्यदिनी कोणत्या जिल्ह्यात कोणाच्या हस्ते होणार ध्वजारोहण, वाचा संपूर्ण यादी

गणेशोत्सवात डीजेवर बंदी, उल्लंघन केलं तर पोलीस करणार कारवाई | VIDEO

Aranya: जंगलाची दाट हिरवाई, धुक्याने व्यापलेले दृश्य; 'अरण्य'मध्ये उलगडणार संघर्षाची गूढ कहाणी

Manoj Jarange: मराठा आंदोलनात दंगल घडवण्याचा कट, मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप|VIDEO

SCROLL FOR NEXT