Bacchu Kadu On Navneet Rana: माझा फोटो वापरून रवी राणांनी प्रचार केला हे विसरू नका, बच्चू कडूंचे राणा दाम्पत्यांना प्रत्युत्तर

Navneet Rana Facebook Post: बच्चू कडू यांनी नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांना प्रत्युत्तर दिले आहे. 'माझा फोटो वापरून रवी राणांनी प्रचार केला हे विसरू नका.', अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे.
Amravati Loksabha Election 2024
Ravi Rana On Navneet RanaSaam Tv

अमर घटारे, अमरावती

अमरावती लोकसभा मतदारसंघातून (Amravati Loksabha Election) भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहिलेल्या नवनीत राणा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यावर टीका केली होती. आता बच्चू कडू यांनी नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांना प्रत्युत्तर दिले आहे. 'माझा फोटो वापरून रवी राणांनी प्रचार केला हे विसरू नका.', अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे.

भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या फेसबुक पेजवरून एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये बच्चू कडू हे हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट असताना त्यांना रवी राणा भेटायला गेले होते. हा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये असे लिहिण्यात आले आहे की, 'जेव्हा कोणीही नव्हतं साथीशी, तेव्हा रवी राणा होते पाठीशी. विसरलात काय बच्चू कडू?' या पोस्टद्वारे त्यांनी बच्चू कडू यांना सवाल विचारला होता.

Amravati Loksabha Election 2024
Amravati Politics : अमरावतीत वंचित बहुजन आघाडीत मोठी फूट; नाराज जिल्हाध्यक्षांनी दिला काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा

आता नवनीत राणा यांच्या या फेसबुक पोस्टवर बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिले आहे. साम टीव्हीशी बोलताना बच्चू कडू यांनी सांगितले की, 'मी पण रवी राणा यांच्या भेटीला गेलो होतो. त्या पण पोस्ट मला टाकता येतात. जेव्हा आम्ही एकत्र निवडणूक लढलो. तेव्हा माझा फोटो वापरून रवी राणा प्रचार करत होते. हे त्यांनी विसरू नये.', अशी टीका बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर केली.

Amravati Loksabha Election 2024
Uddhav Thackeray: मशाल गीतातून 'जय भवानी' शब्द काढा.. निवडणूक आयोगाचे पत्र; उद्धव ठाकरे संतापले!

दरम्यान, राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू यांच्यामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. बच्चू कडू शिवसेना शिंदे गटासोबत गेल्यापासून त्यांच्यावर टीका सुरू आहे. खोके घेऊन आलेले आमदार अशी टीका रवी राणा यांनी केली आहे. नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बच्चू कडू यांनी त्यांच्यावर टीका केली होती. 'नवनीत राणा यांना निवडणुकीत पाडणार.', असा इशारा बच्चू कडू यांनी दिला होता.

Amravati Loksabha Election 2024
Sharad Pawar News: घटनेला धक्का लावणाऱ्यांना विरोध करु; स्वस्थ बसणार नाही.. शरद पवारांचा मोदी- शहांवर हल्लाबोल!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com