Uddhav Thackeray: मशाल गीतातून 'जय भवानी' शब्द काढा.. निवडणूक आयोगाचे पत्र; उद्धव ठाकरे संतापले!

Uddhav Thackeray Press Conference: ठाकरे गटाच्या प्रचार गीतातून जय भवानी, हिंदू धर्माचा उल्लेख असलेले शब्द काढा, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray Saam TV
Published On

सचिन गाड, मुंबई|ता. २१ एप्रिल २०२४

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अशातच निवडणूक आयोगाकडून शिवसेना ठाकरे गटाला नोटीस आल्याची बातमी समोर येत आहे. ज्यामध्ये ठाकरे गटाच्या प्रचार गीतातून जय भवानी, हिंदू धर्माचा उल्लेख असलेले शब्द काढा, असे सांगण्यात आल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. याबाबत आज पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

"निवडणुका आहेत. त्यासाठी एक प्रेरणा गीत लागते. म्हणून आम्ही आम्ही मशाल गीत काढलं आहे. यावर निवडणूक आयोगाने आम्हाला पत्र लिहून दोन शब्द काढायला लावले. "हिंदू तुझा हा धर्म जाणून घे हे मर्म" यामधील हिंदू धर्म शब्द काढायला लावला. तसेच गाण्याच्या बॅकग्राऊंडला असलेल्या 'जय भवानी, जय शिवाजी' घोषणेमधील 'जय भवानी' शब्द काढा," असे निवडणूक आयोगाने सांगितल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.

निवडणूक आयोगाला सवाल!

"आम्ही देखील रामभक्त आहोत हनुमान भक्त आहोत. आई तुळजा भवानी राज्याचं दैवत आहे. जय भवानी जय शिवाजी ही आपण घोषणा करतो. हे आम्ही बोलणारचं. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. कुलदैवतेबद्दल एवढा आकस आहे. ही हुकूमशाही आहे," असे म्हणत कोणत्याही परिस्थितीत शब्द काढणार नसल्याचे सांगितले.

Uddhav Thackeray News
Pimpri Chinchwad : चिमुकल्यासह आईची अकराव्या मजल्यावरून उडी; पिंपरी चिंचवडमधील दुर्दैवी घटना

अमित शहा, मोदींवर कारवाई करणार का?

त्याचबरोबर "अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी देवाच्या नावावर मते मागतात. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली होती. त्यावर अद्याप निवडणूक आयोगाचं उत्तर आले नाही. ते हिंदू धर्मावर मते मागतात. आम्ही हिंदू धर्माच्या आधारावर मत मागितलं नाही. निवडणूक आयोगाने यावर उत्तर द्यावं, जर आमच्यावर कारवाई करायचं आहे तर यांच्यावर देखील कारवाई करावी लागेल," असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

Uddhav Thackeray News
Beed Accident News : मालवाहू गाडी- दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीवरील एका भावाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com