काँग्रेसकडून सुरू असलेला हिंदू-मुसलमानचा खेळ मोदींनी उघड केला, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. एसटी- ओबीसी आरक्षणावर काँग्रेसचा डोळा असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकनंतर कल्याणमध्ये सभा झाली. या सभेमध्ये त्यांनी राहुल गांधींसोबत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर अनेक आरोप देखील केले.
या सभेदरम्यान काँग्रेसवर टीका करत पीएम मोदींनी सांगितले की, 'काँग्रेस कधीच विकासाच्या गोष्टी करत नाही. काँग्रेस फक्त हिंदू-मुस्लिम करत आहे. त्यांच्यासाठी विकास म्हणजे त्यांचाच विकास. ते म्हणतात मोदींनी हिंदू-मुस्लिम केले. परतू ज्यांनी हिंदू-मुस्लिम केले त्यांचा कच्चाचिठ्ठा काढत आहे. काँग्रेसचे सरकार असताना ते उघडपणे सांगत होते की देशाच्या संसाधनावर पहिला अधिकार मुस्लिमांना आहे.'
'ज्या लोकांनी गरीबी हटावचा खोटा नारा दिला. प्रत्येक निवडणुकीत ते हकीकच्या माळा बनवून आणायचे. प्रत्येक निवडणुकीत ते गरीब गरीब करत फिरायचे. हा त्यांचा खेळ सुरू राहायचा. त्यांनी भ्रष्टाचाराला शिष्टाचार बनवून ठेवले होते. अशी लोकं देशाचे नेतृत्व करू शकतात का?, तुमचे स्वप्न पूर्ण करू शकतात का?' असा सवाल पीएम मोदींनी केला आहे. तसंच, 'मागच्या सरकारने विकासाला लावलेला ब्रेक मोदींनी हटवला आणि गाडीला टॉप गिअरमध्ये नेले.', असे देखील त्यांनी सांगितले.
'काँग्रेसचे शहजादे नेहमी सावरकरांच्या विरोधात बोलायचे. पण जेव्हापासून निवडणुकीची घोषणा झाली तेव्हापासून त्यांनी सावकरकांबद्दल शब्दही काढला नाही. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी वीर सावरकरांच्या बाजूने पाच वाक्य बोलली पाहिजे.', असे म्हणत पीएम मोदींनी राहुल गांधी यांना चँलेज केले. तसंच, 'काँग्रेसचे शहजादे पुन्हा हाच खेळ करत आहेत. एसटी- ओबीसी आरक्षणावर त्यांचा डोळा आहे. कर्नाटक ही त्यांची प्रयोग शाळा आहे. त्यांचं सरकार आल्यानंतर मुस्लिमांना रातोरात ओबीसी केलं आणि ओबीसी आरक्षणाची लूट केली. एसटी-ओबीसी आरक्षणाचे तुकडे करत ते मुस्लिमांना देणार.', अशी टीका मोदींनी केली.
दरम्यान, 'सरकार बनल्यानंतर पहिल्या १०० दिवसांत काय काम करायचे याचे नियोजन आम्ही केले आहे. सरकार बनल्यानंतर फक्त गळ्यात हार घालून फिरणार नाही. आज जेवढी मेहनत करत आहोत तेवढीच मेहमत ४ जून नंतरही चालू राहिल. ४ जूननंतर याच ताकदीने काम करणार. 100 दिवसांत काय करायचे याची ब्ल्यू प्रिंट आम्ही तयार करून पुढे चाललो आहोत. मुद्दा मोदींच्या आत्मविश्वासाचा नाही, तर मुद्दा जनतेच्या विश्वासाचा आहे.', असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.