Kalyan Crime : झटपट पैसे कमावण्याच्या नादात मूर्तीकार बनला चोर; लोकलमध्ये चोरी करताना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

Kalyan News : वाशिंद रेल्वे स्थानकात लोकल सुरु होताच दारात उभा असलेला एक तरुण महिलेची चैन हिसकावून फलाटावर उतरला आणि पळ काढला
Kalyan Crime
Kalyan CrimeSaam tv
Published On

अभिजीत देशमुख

कल्याण : मूर्तिकार असल्याने उत्तम मूर्ती घडविण्याचे काम करायचा. परंतु पैशांची गरज भासल्याने मूर्ती घडविण्यातून पैसे मिळत नसल्याने लवकर पैसे कमविण्यासाठी चोरीचा मार्ग पत्करला. यातून रेल्वेमध्ये छोट्या- मोठ्या चोरी करण्यास सुरवात केली. दरम्यान लोकल ट्रेनमधून चैन तोडून नेल्यानंतर हा रेल्वे पोलिसांच्या ताब्यात सापडला. 

Kalyan Crime
Kharif Season : यंदा खरीप हंगामात कापूस लागवडीचे क्षेत्र घटण्याची शक्यता; गतवर्षी शेतकऱ्यांना बसला आर्थिक फटका

वाशिंद रेल्वे स्थानकात लोकल सुरु होताच दारात उभा असलेला एक तरुण महिलेची चैन हिसकावून फलाटावर उतरला आणि पळ काढला. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिस (railway Police) ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यानंतर पोलिसांनी शोध सुरु करत स्टेशनवरील सीसीटीव्ही तपासले. या सोसोटीव्ही (CCTV) फुटेजच्या साहाय्याने कल्याण रेल्वे चोरट्याचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज व मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या चोरट्याला अटक केली. दिनेश धुमाळ असे या चोरट्याचे नाव आहे. 

Kalyan Crime
Yavatmal News : वाऱ्यामुळे वारंवार वीज खंडित; घारफळ उपकेंद्रात ग्रामस्थांची तोडफोड, ऑपरेटरलाही केली मारहाण

दिनेश धुमाळ हा टिटवाळ्याला राहणारा असून तो मूर्तीकार आहे. त्याला पैशाची गरज होती. यामुळे झटपट पैसे (Kalyan) कमवण्याच्या हव्यासापोटी त्याने चोरीचा मार्ग निवडला. दिनेश धुमाळ यांच्या विरोधात याआधी देखील विनीत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती कल्याण रेल्वे पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com