Pune News: पुणे महापालिकेला राष्ट्रीय हरित लवादाचा दणका, १ कोटी ७९ लाखांचा दंड ठोठावला

Pune Municipal Corporation: राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने पुणे महानगर पालिकेला १ कोटींपेक्षा जास्त रुपयाचा दंड ठोठावला आहे. त्याचसोबत हा दंड भरण्यासाठी मुदत देखील दिली आहे.
Pune News
Pune News Saam Tv

सचिन जाधव, पुणे

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडून (national green tribunal) पुणे महानगर पालिकेवर (pune municipal corporation) कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातल्या वाघोलीतील दगडखान कामगार वस्तीजवळ बेकायदा कचरा डेपो उभारून पर्यावरणाची हानी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने पुणे महानगर पालिकेला १ कोटींपेक्षा जास्त रुपयाचा दंड ठोठावला आहे. त्याचसोबत हा दंड भरण्यासाठी मुदत देखील दिली आहे.

बेकायचा कचरा डेपो उभारून पर्यावरणाची हानी केल्याप्रकरणी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने पुणे महापालिकेला १ कोटी ७९ लाख १० हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे. या ठिकाणी पुन्हा कचरा न टाकण्याचा आदेशही देण्यात आला आहे. तसंच, दंडाची रक्कम दोन महिन्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे जमा करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.

वाघोली येथे दगडखान कामगारांची वस्ती असून तिथे २०१५ पासून कचरा टाकण्यात येत आहे. त्यामुळे सुमारे दोन ते तीन एकर जागेवर कचऱ्याचे मोठे ढीग साचले आहे. त्यामुळे या कामगार वस्तीत प्रचंड दुर्गंधी पसरली असून कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. या वस्तीच्या ठिकाणी कचरा टाकू नका, तसेच कचऱ्याचे डेपो दुसरीकडे हलवा याबाबत २०१६ मध्ये तक्रार करण्यात आली होती.

दगडखान कामगार परिषदेच्या वतीने २०१६ मध्ये संतुलन संस्थेने प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे याबाबत तक्रार केली होती. या प्रकरणाचा निकाल आज राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने दिला आहे. हा निकाल देताना न्यायाधिकरणाने पुणे महानगर पालिकेला दंड ठोठावला आहे. महानगर पालिकेला हा दंड दोन महिन्यात भरावा लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com