Narendra Modi Parbhani  Saam TV
लोकसभा २०२४

Narendra Modi: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात विक्रमी मतदान करा; पंतप्रधान मोदींचं मतदारांना आवाहन

Narendra Modi Appeal to voters : लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत पोस्ट करत मतदारांना खास आवाहन केलं आहे.

Satish Daud

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील १३ लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. दरम्यान, मतदानाला सुरुवात होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत पोस्ट करत मतदारांना खास आवाहन केलं आहे.

लोकसभा २०२४ लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आज ८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ४९ जागांसाठी मतदान होत आहे, ज्या जागांसाठी आज मतदान होत आहे त्यासाठी सर्वांना विक्रमी संख्येने मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे, अशी पोस्ट पंतप्रधान मोदी यांनी केली आहे.

विशेषत: महिला मतदारांना आणि तरुण मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे मी आवाहन करतो, असं आवाहन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्वीटर) अकाउंटवरून केलं आहे. त्यामुळे मतदार मोदींच्या आवाहनाला काय प्रतिसाद देणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रात कुठे कुठे मतदान

पाचव्या टप्प्यासाठी महाराष्ट्रातील १३ मतदारसंघात मतदान होत आहे. यामध्ये दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, वायव्य मुंबई या जागांचा समावेश आहे. याशिवाय ठाणे, कल्याण, पालघर, नाशिक, धुळे, दिंडोरी, आणि भिवंडी अशा १३ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे.

मुंबईत होणार रंगतदार लढत

  • दक्षिण मुंबई - अरविंद सावंत (ठाकरे गट) विरुद्ध यामिनी जाधव (शिंदे गट)

  • उत्तर पश्चिम - अमोल कीर्तिकर (ठाकरे गट) विरुद्ध रवींद्र वायकर (शिंदे गट)

  • दक्षिण मध्य - राहुल शेवाळे (शिंदे गट) विरुद्ध अनिल देसाई (ठाकरे गट)

  • ईशान्य मुंबई - संजय दिना पाटील (ठाकरे गट) विरुद्ध मिहीर कोटेचा (भाजप)

  • उत्तर मध्य - उज्ज्वल निकम (भाजप) विरुद्ध वर्षा गायकवाड (काँग्रेस)

  • उत्तर मुंबई - पियूष गोयल (भाजप) विरुद्ध भूषण पाटील (काँग्रेस)

  • कल्याण - श्रीकांत शिंदे (शिंदे गट) विरुद्ध वैशाली दरेकर (ठाकरे गट)

  • ठाणे - नरेश म्हस्के (शिंदे गट) विरुद्ध राजन विचारे (ठाकरे गट)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lasun Chutney: जेवणासोबत चटपटीत खाण्याची इच्छा होतेय? मग लगेचच बनवा लसणाची चटणी, वाचा रेसिपी

BJP Office: भाजप मुख्यालयाबाहेर मोठा स्फोट, कानठळ्या बसवणाऱ्या आवाजानं परिसर हादरला; चंदीगडमध्ये खळबळ

Fansache Cutlet Recipe : घरी 'असे' बनवा १० मिनिटांत फणसाचे कटलेट्स, एक घास खाताच पाहुणे करतील कौतुक

Bhajyanchi Amti Recipe: खान्देशी स्टाईल झणझणीत भज्यांची आमटी कशी बनवायची? पाहा ही सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: जोतिबा डोंगरावरील दक्षिण दरवाजाजवळ झाडावर वीज कोसळली

SCROLL FOR NEXT