Maharashtra Lok Sabha Voting Live: भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

Mumbai, Thane, Kalyan, Nashik, Thane, South Bhiwandi Constituency Lok Sabha Election 2024 Voting Live Marathi News: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील आज मतदान होणार आहे. एकूण ६ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमधील ४९ जागांसाठी थोड्याच वेळात मतदानाला सुरूवात होईल.
Maharashtra Election 2024 Voting 2024 Live: लोकसभा निवडणूक मतदान पाचव्या टप्प्यातील मतदानाचे लाईव्ह अपडेट
Kalyan, Nashik, Thane, Mumbai, South Bhiwandi Constituency Lok Sabha Voting Phase 5 Live Marathi News By Saam TVSaam TV

भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

मतदान प्रक्रिया सुरु असतानाच उबाठा गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत खोटी व दिशाभूल करणारी विधाने केली

सत्ताधारी भाजपावर बिनबुडाचे आरोप करतानाच त्यांनी निवडणूक आयोगावरही हेतू आरोप केले आहेत

हे आचारसंहिता उल्लंघन असून यावर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

नाशिकमध्ये  मतदानाची टक्केवारी वाढली, 61 टक्के मतदानाची नोंद

- नाशिक लोकसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी वाढली

- नाशिक लोकसभेसाठी 61 टक्के मतदान

- 2019 मध्ये नाशिक लोकसभेसाठी झालं होतं 59. 41 टक्के मतदान

- वाढलेलं मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार?

- ४ जूनच्या निकालाची सर्वांनाच उत्सुकता

Lok Sabha Election : लोकसभेच्या निवडणुका झाल्या आता विधानसभेच्या तयारीला लागा, शरद पवार गटाचं कार्यकर्त्यांना आवाहन

राष्ट्रवादी पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

लोकसभेच्या निवडणुका झाल्या आता विधानसभेच्या निवडणुकांची तयारी करू

विधानसभेला शरद पवारांचे विचाराचे सरकार आपल्याला आणायचे आहे

जयंत पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

लोकसभेचे मतदान संपताच विधानसभेच्या तयारीला पवार गट लागला

निकालाआधीच सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामाच्या कार्यकर्त्यांनी कल्याणमध्ये फोडले फटाके

निवडणुकीच्या निकालाआधीच सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामाच्या कार्यकर्त्यांनी कल्याणमध्ये फोडले फटाके. सुरेश उर्फ बाळ्या मामा निवडून येणार कार्यकर्त्यांचा विश्वास कल्याण पश्चिमेतील अण्णा साहेब वर्तक रोड परिसरात कार्यकर्त्यांनी फोडले

दक्षिण मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघात राडा

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात घोषणाबाजी

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची पन्नास खोके एकदम ओक्के म्हणून घोषणाबाजी

काही काळ परिसरात तणावाचे वातावरण

पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वातावरण निवळण्यास सुरुवात

Nashik and Dindori Lok Sabha : तृतीयपंथींनी बजावला मतदानाचा हक्क

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आज पाचव्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली, यावेळी लाखो मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. नाशिक जिल्ह्यात नोंदणीकृत असलेल्या ११५ तृतीयपंथी मतदारांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला. जुने नाशिक भागातील मतदान केंद्रावर सलमा गुरू यांच्या मानवता किन्नर समाजाच्या तृतीयपंथींनी मतदानाचा हक्क बजावला.

Lok Sabha Election : आरे मतदार केंद्रात ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

आरे मतदार केंद्रात मोठी गर्दी,

ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्त्यांची गर्दी

निवडणूक अधिकारी दोन्ही पक्षांना समजून बाहेर काढत आहेत

रवींद्र वायकर यांची पत्नी आणि मुलगी निवडणूक अधिकाऱ्यांकडून माहिती घेत आहेत

गोरेगाव आरे कॉलनी मतदार केंद्रात स्लो वोटिंग चालू आहे,

मोठी गर्दी दुपारपासून या मतदार केंद्रात पाहायला मिळत आहे

Lok Sabha Election Update : सायंकाळी ६ पर्यंत जे मतदार मतदान केंद्रावर असतील त्या सर्वांना मतदानाचा हक्क बजावता येईल; निवडणूक आयोग

आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत जे मतदार मतदान केंद्रावरील रांगेत असतील त्या सर्वांना मतदानाचा हक्क बजावता येईल अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

Lok Sabha Election : प. बंगालमध्ये उच्चांकी ७३ टक्के मतदान, महाराष्ट्रात फक्त ४८.६६ टक्के

बिहार - 52.35%

जम्मू काश्मीर - 54.21%

झारखंड - 61.90%

लडाख - 67.50%

महाराष्ट्र - 48.66%

ओडिसा - 60.55%

उत्तर प्रदेश - 55.80%

पश्चिम बंगाल - 73.00%

Lok Sabha Election Update : पाचव्या टप्प्यातील 13 मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत 48.66 टक्के मतदान

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि. 20 मे 2024 रोजी सकाळी 7 वाजेपासून सूरू झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण 13 मतदार संघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे सरासरी 48.66 टक्के मतदान झाले आहे.

भिवंडी- 48.89 टक्के

धुळे- 48.81 टक्के

दिंडोरी- 57.06 टक्के

कल्याण - 41.70 टक्के

मुंबई उत्तर - 46.91 टक्के

मुंबई उत्तर मध्य - 47.32 टक्के

मुंबई उत्तर पूर्व - 48.67 टक्के

मुंबई उत्तर पश्चिम - 49.79 टक्के

मुंबई दक्षिण - 44.22 टक्के

मुंबई दक्षिण मध्य- 48.26 टक्के

नाशिक - 51.16 टक्के

पालघर- 54.32 टक्के

ठाणे - 45.38 टक्के

Lok Sabha Election : रवींद्र वायकर यांना मतदार केंद्रात जाण्यापासून रोखलं, आरे डेअरी येथील मतदान केंद्राबाहेर शिवसेनेचे अनेक पदाधिकारी जमले

अरे डेअरी येथील मतदान केंद्राबाहेर शिवसेनेचे अनेक पदाधिकारी जमले,

काही वेळापूर्वी शिवसेना उमेदवार रवींद्र वायकर यांना मतदार केंद्रात जाण्यापासून रोखण्यात आले शिवाय त्यांना अपमानास्पद रित्या येथून बाहेर जाण्यासाठी सांगितल्याने अनेक कार्यकर्ते संतापले आहेत.

पोलिसांकडून मतदान केंद्राबाहेर गर्दी करू नये अशा स्वरूपाच्या सूचना देणे सुरू आहे..

थोड्या वेळात उमेदवार रवींद्र वायकर उपस्थित झाल्यास येथे संबंधित प्रशासनाला जाब विचारण्याची शक्यता

माहीम मच्छीमार कॉलनीत उध्दव ठाकरे यांनी दिले आदेश

सर्व लोकांचे मतदान होण्याची खबरदारी घेण्याचे दिले आदेश.

मुंबईत मतदान संदर्भात अनेक तक्रारी येत असल्याने उद्धव ठाकरे यांनी कडक भूमिका घेतली...

पत्रकार परिषदेमध्ये देखील सर्वांचे मतदान पूर्ण होईल या संदर्भात भूमिका घेतली

मुंब्रातील अनेक मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा, उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा

मुंब्रा येथील अनेक मतादान केंद्रावर मतदारांच्या लाबंच लांब रांगा लागल्या आहेत. चार चार तास रांगेत उभे रहावं लागत असल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी माहिममध्ये भेट देऊन मतदान केंद्रावरील आढावा घेतला.

देशभरात दुपारी ३ पर्यंत पं. बंगालमध्ये सर्वाधिक तर महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

बिहार - 45.33%

जम्मू काश्मीर - 44.90%

झारखंड - 53.90%

लडाख - 61.26%

महाराष्ट्र - 38.77%

ओडिसा - 48.95%

उत्तर प्रदेश - 47.55%

पश्चिम बंगाल - 62.72%

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात दुपारी 3 पर्यंत 38.77 टक्के मतदान

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि. 20 मे 2024 रोजी सकाळी 7 वाजेपासून सूरू झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण 13 मतदार संघात दुपारी 3 वाजेपर्यंत सुमारे सरासरी 38.77 टक्के मतदान झाले आहे.

भिवंडी- 37.06 टक्के

धुळे- 39.97 टक्के

दिंडोरी- 45.95 टक्के

कल्याण - 32.43 टक्के

मुंबई उत्तर - 39.33 टक्के

मुंबई उत्तर मध्य - 37.66 टक्के

मुंबई उत्तर पूर्व - 39.15 टक्के

मुंबई उत्तर पश्चिम - 39.91 टक्के

मुंबई दक्षिण - 36.64 टक्के

मुंबई दक्षिण मध्य- 38.77 टक्के

नाशिक - 39.41 टक्के

पालघर- 42.48 टक्के

ठाणे - 36.07 टक्के

*

Loksabha Election: मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत  ३६.६४ टक्के मतदान

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला मुंबई शहर जिल्ह्यातील ३१- मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात आज दि. २० मे २०२४ रोजी सकाळी ०७.०० वाजेपासून सुरुवात झाली. ३१ - मुंबई दक्षिण मतदारसंघातील एकूण ६ विधानसभा मतदारसंघात दुपारी ०३.०० वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ३६.६४ टक्के मतदान झाले आहे.

१८४-भायखळा - ३७.२७ टक्के

१८७-कुलाबा -३०.६२ टक्के

१८५-मलबार हिल - ४०.०१ टक्के

१८६-मुंबादेवी - ३७.०१ टक्के

१८३- शिवडी - ३८.८० टक्के

१८२-वरळी - ३६.१२ टक्के

ही आकडेवारी अंदाजे असून अंतिम आकडेवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे.

Maharashtra Elections :  भिवंडी लोकसभा मतदारसंघातील हजारो नागरिकांची नावं मतदार यादीतून गायब

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिममध्ये निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ समोर आला . मतदार यादीमधून हजारो नागरिकांचे नाव गायब झाले धक्कादायक म्हणजे ज्या मतदारांनी इथून मागे दोन-तीन वेळा मतदान केले त्या मतदारांचं देखील नाव निवडणुकीच्या यादीतून गायब आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय.

Nashik Lok Sabha : मी एव्हीएमला नाही, भारत मातेला हार घातला; गुन्हा दाखल झाल्यानंतर शांतीगिरी महाराजांची पहिली प्रतिक्रिया

शांतिगिरी महाराज बाईट पॉईंट्स

- मी ईव्हीएम ची पूजा केलेली नाही किंवा हार देखील घातलेला नाही

- मी ईव्हीएमला हार घातला नाही, बाहेरच्या कव्हरला हार घातला

- कव्हरवर भारत मातेचे चित्र होतं, त्या भारत मातेला वंदन म्हणून मी हार घातला

- गुन्हा दाखल झाला त्याबाबत आमचे वकील पुढील कार्यवाही करतील

- जे झालं ते आचारसंहितेचा भंग आहे याची आम्हाला कल्पना नव्हती

- सर्वांमध्ये भगवंत आहे असा आमचा ठाम निर्धार आहे

- चुकीच्या मुद्द्यांच्या आधारे गुन्हा दाखल केला गेला

- त्यांना चुकीचं वाटत होतं तर त्यांनी त्याच वेळी तो हार काढून टाकायला हवा होता

Loksabha Election: नाशिकच्या येवला तालुक्यातील सावरगाव व चिचोंडी खुर्द या केंद्रावरील EVMमध्ये बिघाड

नाशिकच्या येवला तालुक्यातील सावरगाव व चिचोंडी खुर्द या केंद्रावर सुमारे एक तासांपासून ईव्हीएममध्ये बिघाड झालाय. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सध्या सुरू असून मतदान प्रक्रिया सकाळी सुरू झाल्यानंतर काही तासातच येवला तालुक्यातील सावरगाव व चिचोंडी खुर्द येथील ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाला यामुळे येथील मतदारांना एक तास भर ताटकळत राहावे लागले .

CM eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा

मीरा भाईंदर शहरात मुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा

CM शिंदे कार्यकर्त्यांच्या धावत्या भेटी घेत आहेत

सोबत आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के आहेत.

मुख्यमंत्री आल्याने पोलिसांची एकच तारांबळ उडाली आहे.

Maharashtra Elections : राज्यात लोकसभा निवडणुकीत दुपारी १ वाजेपर्यंत २७.७८ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत २७.७८ टक्के मतदान झालं आहे.

धुळे- २८.७३ टक्के

दिंडोरी- ३३.२५ टक्के

नाशिक - २८.५१ टक्के

पालघर- ३१.०६ टक्के

भिवंडी- २७.३४ टक्के

कल्याण - २२.५२ टक्के

ठाणे - २६.०५ टक्के

मुंबई उत्तर - २६.७८ टक्के

मुंबई उत्तर - पश्चिम - २८.४१ टक्के

मुंबई उत्तर - पूर्व - २८.८२ टक्के

मुंबई उत्तर - मध्य - २८.०५ टक्के

मुंबई दक्षिण - मध्य- २७.२१ टक्के

मुंबई दक्षिण - २४.४६ टक्के

johnny lever : अब्बा डब्बा विचार करून बटन दाबलं - जॉनी लिव्हर

मतदान केल्यापर्यंत जॉनी लिव्हर काय म्हणाले?

मतदान केलं पाहिजे

देशासाठी काही चांगलं व्हायचं असेल तर नक्की मतदान करायला हवं

मी अब्बा डब्बा विचार करून बटन दाबलं

Anil Ambani : अनिल अंबानी यांनी रांगेत उभा राहून बजावला मतदानाचा हक्क

उद्योगपती अनिल अंबानी यांनी मतदानाचा हक्क बजावला.

अंबानी यांनी रांगेत उभा राहून मतदानाचा हक्क बजावला.

Thane Lok Sabha Voting : नवी मुंबईत मतदार यादीत मोठा घोळ, नागरिकांमध्ये संताप

नवी मुंबईत मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ समोर आला आहे.

मतदार यादीमध्ये घोळ असल्याने नागरिकांमध्ये संताप पाहायला मिळाला.

वाशीमधील अनेक मतदारांची नावे तुर्भे विभागातील मतदान केंद्रावर आहेत.

राहत्या घरापासून तब्बल चार किलोमीटर लांब मतदान केंद्रावर नाव आल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला.

एवढ्या लांब नाव असेल तर निवडणूक आयोगाने आमची सोय करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

Nashik Lok Sabha : शांतिगिरी महाजारांच्या ४ सहाकाऱ्यांवर गुन्हा

शांतिगिरी महाराजांच्या ४ सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. नाशिकच्या अंबड पोलिसांत शांतिगिरी महाराजांच्या ४ सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

भगव्या रंगाचे कपडे, त्यावर जय बाबाजी नाव लिहिलेला लोगो तसेच बादली चिन्ह असलेल्या स्लीप मतदारांना वाटल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मतदानाच्या दिवशी प्रचारावर बंदी असताना देखील प्रचार करून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Aadesh Bandekar :  पवईत मतदार केंद्रात दोन तासांपासून लांबच लांब रांगा; अभिनेता आदेश बांदेकरही रांगेत

पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रात मागील दोन तासांपासून लांबच लांब रांग आहेत.

सिनेअभिनेते आणि शिवसेना सचिव आदेश बांदेकर देखील रांगेत उभे आहेत.

Mumbai News : मुंबईतील पवई मतदान केंद्रावर नागरिकांचा गोंधळ

पवई मतदान केंद्रावर कुठल्या सुविधा नसल्याने नागरिकांनी गोंधळ केला.

मतदान प्रक्रिया हळुवार पद्धतीने सुरू असल्याचे अनेकांचे आरोप आहेत.

Mumbai Voting Live : ईशान्य मुंबईतील भांडूपमध्ये विद्य्युत पुरवठा खंडित, गेल्या अर्ध्या तासापासून मतदान प्रक्रिया बंद

ईशान्य मुंबईतील भांडुप खिंडीपाडा ओमेगा हायस्कूल परिसरातील मतदान केंद्रावरील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे गेल्या अर्ध्या तासापासून केंद्रावर मतदान प्रक्रिया बंद झाली आहे.

Mumbai Voting Live :ईशान्य मुंबईत ईव्हीम मशीन बंद पडल्याच्या तक्रारी

ईशान्य मुंबई ईव्हीम मशीन बंद पडल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

मानखुर्द शिवाजीनगर येथील बुथ क्रमांक 63 आणि 65 मधील ईव्हीएम मशीन दीड तासापासून बंद आहेत.

त्यामुळे मतदारांना त्रासाला सामारे जावे लागत आहे.

Oshiwara news : ओशिवारामध्ये भाजप-ठाकरे गट आमने-सामने

ओशिवारामध्ये भाजप-ठाकरे गट आमने-सामने आले आहेत.

ओशिवारातील मतदान केंद्रावर भाजप-ठाकरे गट आमने-सामने आले.

यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केली.

Ramesh bais : राज्यपाल रमेश बैस यांनी केलं मतदान

राज्यपाल रमेश बैस यांनी आज दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात मलबार हिल येथील राजभवन भवन क्लब मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. यावेळी राज्यपाल बैस यांच्या पत्नी रामबाई यांनी देखील मतदान केले.

Maharashtra Lok Sabha Voting : राज्यातील मतदारसंघतील ११ वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी आली समोर

धुळे- १७.३८ टक्के

दिंडोरी- १९.५० टक्के

नाशिक - १६.३० टक्के

पालघर- १८.६० टक्के

भिवंडी- १४.७९ टक्के

कल्याण - ११.४६ टक्के

ठाणे - १४.८६ टक्के

मुंबई उत्तर - १४.७१ टक्के

मुंबई उत्तर - पश्चिम - १७.५३ टक्के

मुंबई उत्तर - पूर्व - १७.०१ टक्के

मुंबई उत्तर - मध्य - १५.७३ टक्के

मुंबई दक्षिण - मध्य- १६.६९ टक्के

मुंबई दक्षिण - १२.७५ टक्के

मुलुंडमधील बूथमध्ये इव्हीएम मशीन अर्धातासांपासून बंद

ईशान्य मुंबईतील मुलुंड पूर्व बूथ क्रमांक 126 येथील ईव्हीएम मशीन अर्धा तासापासून बंद आहे.

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मुलुंड पूर्व बूथ आहे. या बूथमधील मशीन अर्धा तासापासून बंद आहे.

Maharashtra Election : नाशिकच्या दिंडोरी, नांदगावमध्ये मतदान यंत्र बंद पडल्याच्या तक्रारी

- दिंडोरी लोकसभा मतदारसंघात काही ठिकाणी मतदान यंत्र बंद पडल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

- नांदगाव विधानसभा मतदारसंघातही काही ठिकाणी मतदान यंत्र बंद पडल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

Maharashtra Election : अभिनेते धर्मेंद्र यांनी केलं मतदान

मुंबईत आज बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी मतदान केले.

खासदार हेमा मालिनी यांनी सुद्धा मुंबईत बजावला मतदानाचा हक्क बजावला.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी मतदानाचा हक्क बजावला

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केलं.

राज ठाकरेंनी मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला.

उद्धव ठाकरे यांनी मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात मतदानाचा हक्का बजावला.

Maharashtra Election : ईशान्य मुंबईतील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची सुटका

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी सुटका केली.

कांजूरमार्ग पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

पोलीस प्रक्रिया करून दोघांची सुटका केली.

संदीप कदम उपशाखाप्रमुख, समीर दिवेकर या दोन्ही शिवसैनिकांची सुटका करण्यात आली आहे.

Nashik Lok Sabha : कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदानाला जाणाऱ्या तरुणांना पोलिसांनी अडवले

नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वडगाव-पंगू येथील काही तरुणांनी कांद्याला भाव नसल्याने अनोखा निषेध करण्याचा प्रयत्न केला. कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदानाला जात असताना गेटवरवरच पोलिसांनी त्यांना अडवलं. त्यानंतर त्यांना गळ्यातील कांद्याच्या माळा काढण्यास सांगितले. पोलिसांबरोबर त्यांची शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर गळ्यातील माळा काढून ठेवत मतदानाला गेले.

Mumbai Lok Sabha Voting Live : ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मोठा गोंधळ, शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

मुंबई ईशान्य मुंबई मतदारसंघात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. ठाकरे गटाच्या दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मतदान केंद्राबाहेर उमेदवारांची चिठ्ठी घेऊन बसल्यामुळे त्यांना ताब्यात घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं. तर आम्ही मतदान केंद्रावर नागरिकांना पोहचवत होतो. मात्र, पोलिसांनी दडपशाही करत आम्हाला ताब्यात घेतलं, असा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

Mumbai South Lok Sabha Voting Live : मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ७.७९ टक्के मतदान

मुंबई, दि. २० मे, २०२४ :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला मुंबई शहर जिल्ह्यातील ३०- मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात आज दि. २० मे २०२४ रोजी सकाळी ०७.०० वाजेपासून सुरुवात झाली. ३०- मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातील एकूण ६ विधानसभा मतदारसंघात सकाळी ०९.०० वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ७.७९ टक्के मतदान झाले आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील ३०- मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय सरासरी टक्केवारी (अंदाजे) पुढीलप्रमाणे----

१७२-अणुशक्ती नगर - ०७.०० टक्के

१७३-चेंबूर - ०७.२४ टक्के

१७८-धारावी - ०५.३० टक्के

१८१-माहीम - ०८. ९८टक्के

१७९-माहीम कोळीवाडा - १२.०० टक्के

१८०- वडाळा - ०५.५७ टक्के

Mumbai South Lok Sabha Voting Live : तुकाराम मुंढे यांनी कुटुंबियांसमवेत बजावला मतदानाचा हक्क

तुकाराम मुंढे यांनी कुटुंबियांसमवेत बजावला मतदानाचा अधिकार

मुंबईतील मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क

मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात जाऊन केलं मतदान

Mumbai Lok Sabha Voting Live : खासदार संजय राऊत यांनी बजावला मतदानाचा हक्क

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

Thane Lok Sabha Voting Live : शिंदे पिता-पुत्रांनी केलं मतदान, मतदारांना केलं खास आवाहन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला. लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी तरुण तसेच महिला मतदारांनी घराबाहेर पडावे, जास्तीत जास्त मतदान करावे, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

Maharashtra Lok Sabha Voting Live : पाचव्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी समोर; सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान

मुंबई, दि.२० : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि.२० मे २०२४ रोजी सकाळी ७.०० वाजेपासून सुरू झाले आहे.पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.३३ टक्के मतदान झाले आहे.

पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

धुळे- ६.९२ टक्के

दिंडोरी- ६.४० टक्के

नाशिक - ६.४५ टक्के

पालघर- ७.९५ टक्के

भिवंडी- ४.८६ टक्के

कल्याण - ५.३९ टक्के

ठाणे - ५.६७ टक्के

मुंबई उत्तर - ६.१९ टक्के

मुंबई उत्तर - पश्चिम - ६.८७ टक्के

मुंबई उत्तर - पूर्व - ६.८३ टक्के

मुंबई उत्तर - मध्य - ६.०१ टक्के

मुंबई दक्षिण - मध्य- ७.७९ टक्के

मुंबई दक्षिण - ५.३४ टक्के

Nashik Lok Sabha Voting LIVE : मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, काय आहे कारण?

नाशिक लोकसभा मतदारसंघातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. शांतिगिरी महाराज यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मतदान केंद्राबाहेर महाराजांच्या नावाच्या चिठ्ठ्या वाटल्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यापुढे असा प्रकार केल्यास थेट अटक करू अशी तंबी देखील पोलिसांनी दिली आहे.

Thane Election Voting LIVE : नरेश म्हस्के यांनी बजावला मतदानाचा हक्क, विजयाचा व्यक्त केला विश्वास

ठाणे लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेश मस्के यांनी मतदानाचा हक्क बजावला. यानंतर माध्यमांसोबत संवाद साधताना निवडणुकीत आपलाच विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला. नरेश म्हस्के यांच्याविरोधात ठाकरे गटाने राजन विचारे यांना उमेदवारी दिली आहे.

Dhule Election Voting LIVE : नाशिकचे पालकमंत्री दादा भुसेंनी बजावला मतदानाचा हक्क

नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी बजावला मतदानाचा हक्क.

मालेगावातील शुभदा हायस्कुलमध्ये पत्नी व मुलासह केले मतदान.

धुळे लोकसभेसाठी दादा भुसे यांनी केले मतदान मंत्री असूनही रांगेत राहीले उभे.

उत्तर महाराष्ट्रात महायुतीला ८ जागा मिळणार, असं दादा भुसे म्हणाले.

अहिराणी भाषेतून दादा भुसेंनी केले मतदारांना मतदानाचे आवाहन.

Kalyan Lok Sabha Election 2024 Voting : शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार वैशाली दरेकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

कल्याण-डोंबिवली लोकसभेच्या शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार वैशाली दरेकर यांनी मतदानाचा हक्क बजावला. डोंबिवली पूर्वेकडील गोग्रासवाडी परिसरातील प्रकाश विद्यालय येथील मतदान केंद्रावर जाऊन दरेकर यांनी मतदान केलं. यावेळी वैशाली दरेकर यांनी मतदानाचा हक्क दरवेळेला बजावतो मतदान केल्यानंतर आनंद होतोय छान वाटतंय, असे सांगितले.

Mumbai South Election Voting LIVE : महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी सहकुटुंब केले मतदान

दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल रमेश शेवाळे यांनी मानखुर्द येथील मतदान केंद्रावर जाऊन सहकुटुंब मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सौ कामिनी राहुल शेवाळे, मुलगा स्वयम शेवाळे उपस्थित होते. विशेष म्हणजे स्वयम शेवाळे याचे हे पहिले मतदान आहे. मतदानापूर्वी राहुल शेवाळे यांनी मानखुर्द येथील नर्मदेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

Mumbai Lok Sabha Voting LIVE : बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने मुंबईत बजावला मतदानाचा हक्क 

बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक फरहान अख्तरने केलं मतदान

फरहान सोबत त्याची बहीण झोया अख्तरने सुद्धा बजावला मतदानाचा हक्क

दोघांनी मुंबईतील मतदान केंद्रावर केलं मतदान.

Palghar Election Voting LIVE : पालघरच्या दातिवरे येथे १५ मिनिटांपासून EVM बंद, मतदान केंद्राबाहेर रांगा

पालघर लोकसभा मतदारसंघात सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. मात्र, मतदानाला सुरुवात होताच सफाळे पश्चिमेला असलेल्या दातिवरे येथे ईव्हीएमचा खोळंबा झाला. तांत्रिक बिघाड झाल्याने मशीन बंद पडलं. गेल्या १५ मिनिटापासून मशीन बंद असल्याने मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या. दातिवरे येथील बुथ क्रमांक 232 मधील ईव्हीएम बंद पडलं आहे.

Mumbai Lok Sabha Voting LIVE : अभिनेता राजकुमार रावने बजावला मतदानाचा हक्क

अभिनेता राजकुमार राव याने बजावला मतदानाचा हक्क

मुंबईतील मतदान केंद्रावर सकाळीच जाऊन बजावला हक्क

मोठ्या संख्येने मतदान करण्याचे राजकुमार रावकडून आवाहन

Kalyan Election Voting LIVE : डोंबिवली पूर्वेत EVM मशीनमध्ये बिघाड, मतदारांचा खोळंबा

कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघात सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. मात्र, काही वेळातच डोंबिवली पूर्वेकडील मंजुनाथ शाळा येथील मतदान केंद्रात एक मशीन बंद पडलं. सकाळपासूनच हे मशीन बंद पडलंय. त्यामुळे मतदारांचा मोठा खोळंबा झाला आहे. सध्या ईव्हीएम दुरुस्तीचे काम सुरू आहेत.

Thane Election Voting LIVE : भाजप आमदार गणेश नाईक यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

भाजप आमदार गणेश नाईक यांनी कोपरखैरणे मधील आर एफ नाईक विद्यालयात केले मतदान.

माजी खासदार संजीव नाईक माजी महापौर सागर नाईक यांनी देखील मतदान करण्याचा हक्क बजावला.

आमदार गणेश नाईक यांनी केलं पहिले मतदान.

सहपरिवार नाईक कुटुंबियांनी बजावला मतदानाचा हक्क.

तर माजी आमदार संदीप नाईक यांनी विद्या प्रसारक हायस्कूल बेलापूर गाव येथे केले मतदान.

Thane Election Voting LIVE : ठाण्यात ईव्हीएम मशीनचा खोळंबा, मतदार ताटकळले

ठाणे लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र, नौपाडा येथील ईव्हीएम मशीन बंद पडले आहेत. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सध्या ईव्हीएम दुरुस्तीचे काम सुरु आहे.

Mumbai Lok Sabha Voting LIVE : अंधेरीत मतदानाला सुरुवात, ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदानाची विशेष सोय

अंधेरी पूनम नगर येथील सेंट झेवियर्स शाळेत मतदानाला सुरुवात

बरोबर सातच्या ठोक्याला झाली मतदानाला सुरुवात

मतदारांनी साडेसहा वाजल्यापासूनच लावल्या होत्या रांगा

अंधेरी पूनम नगर येथे मोठ्या उत्साहात मतदानाला सुरुवात

ज्येष्ठ नागरिकांसाठी करण्यात आली आहे विशेष सोय

Nashik Lok Sabha Voting LIVE : नाशिकमध्ये मतदान सुरू होण्याआधीच EVM बंद, कर्मचाऱ्यांची तारांबळ

नाशिकमध्ये मतदान सुरू होण्याआधीच ईव्हीएम मशीन बंद आडगाव परिसरातील दोन ईव्हीएम मशीन बंद झाल्याने कर्मचाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे. सध्या ईव्हीएम दुरुस्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

Lok Sabha Election 2024 Voting LIVE : पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, मतदार केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा

लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्राबाहेर मतदारांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. विक्रमी संख्येने मतदान करा, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी मतदारांना केलं आहे.

Mumbai Lok Sabha Voting LIVE : मुंबईत थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात, पोलिसांचा तगडा बंदोबस्त

लोकसभेच्या पाचव्या टप्प्याच्या मतदानासाठी मुंबईमध्ये काही वेळेतच सुरुवात होत आहे. तत्पूर्वी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे . या पाचव्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. ज्यामध्ये 264 उमेदवारांचे भवितव्य या निवडणुकीसाठी महत्त्वाचा आहे. यातच अनेक मतदान बुध जवळ मोठ्या प्रमाणात पोलीस पहारा तैनात करण्यात आलंय. शिवाय १०० मीटर परिसरामध्ये कुणालाच एन्ट्री देण्यात आलेली नाहीये.

Lok Sabha Election 2024 Voting LIVE : लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी थोड्याच वेळात मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील आज मतदान होणार आहे. एकूण ६ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमधील ४९ जागांसाठी थोड्याच वेळात मतदानाला सुरूवात होईल. यामध्ये महाराष्ट्रातील १३ मतदारसंघ, उत्तर प्रदेशातील १४, पश्चिम बंगालमधील ७, बिहारमधील ५, झारखंडमधील ३, ओडिशातील ५, जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील प्रत्येकी एका मतदारसंघाचा समावेश आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.