Sharad Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis Saam Tv
लोकसभा २०२४

Sharad Pawar Group: भाजपा- शिंदे गटाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत पंतप्रधान, शरद पवार गटाने निवडणूक आयोगात केली तक्रार

Lok Sabha Election 2024: एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाविरोधात शरद पवार गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

Satish Kengar

>> रुपाली बडवे

Lok Sabha Election 2024:

एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाविरोधात शरद पवार गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. भाजपा- शिंदे गटाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा समावेश असल्याने ही तक्रार नोंदवण्यात आल्याची माहिती शरद पवार गटाकडून देण्यात आली आहे. हा आचारसंहितेचा भंग असल्याचे शरद पवार गटाचे म्हणणे आहे. निवडणूक आयोगाने याप्रकरणी कारवाई करावी, अशी शरद पवार गटांची मागणी आहे.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार पक्षाने 'एक्स'वर पोस्ट करून माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये शरद पवार गटाने लिहिलं आहे की, ''शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि भारतीय जनता पक्ष यांनी लोकप्रतिनिधी कायदा आणि आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत आम्ही भारतीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.'' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या पोस्टमध्ये असं लिहिलं आहे की, ''शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांनी त्यांच्या स्टार प्रचारक यादीचा भाग म्हणून इतर राजकीय पक्षांमधील विविध व्यक्तींची नावे प्रसिद्ध केली आहेत, जी लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 77 चे उल्लंघन करणारी आहे.''  (Latest Marathi News)

शरद पवार गटाने पोस्टमध्ये लिहिलं की, ''शिवसेनेने (एकनाथ शिंदे) पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री इत्यादी उच्च सार्वजनिक पदावर असलेल्या विविध लोकांची नावे प्रसिद्ध केली आहेत. हे केवळ लोकप्रतिनिधी कायद्याचेच उल्लंघन नाही, तर आदर्श आचारसंहितेचेही उल्लंघन आहे. कारण केंद्रात किंवा राज्यात सत्तेत असलेल्या पक्षाच्या प्रतिनिधींना निवडणूक प्रचारासाठी त्यांच्या अधिकृत पदांचा वापर करण्यास स्पष्टपणे प्रतिबंधित केले आहे.''

भारताचा निवडणूक आयोग आपल्या देशात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांच्या पावित्र्याचे रक्षण करण्यासाठी कठोर कारवाई करेल, असंही शरद पवार गटाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी शिंदे गट आणि भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीच फोटोही शेअर केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur Pepar Leak: १२ वीच्या पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट, निवृत्त उपप्राचार्यानेच फोडला पेपर

Iran Israel War : युद्धाचा भडका! ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणवर मोठा हल्ला, तेहरानमधील तेल प्रकल्प उडवले; VIDEO समोर

Maharashtra Live News Update: शिरूर तालुक्यातील चव्हाणवाडी येथे स्क्रॅपच्या गोडाऊनला भीषण आग

Raisin Water Benefits For Skin: रोज सकाळी प्या मनुक्याचं पाणी, त्वचा होईल गुळगुळीत

Anurag Dobhal : १५० च्या स्पीडमध्ये कार, डोळ्यात अश्रू; युट्यूबर अनुराग डोभालचा आत्महत्येचा प्रयत्न, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT