Satara News: साताऱ्यात दोन्ही राजेंचं मनोमिलन! छत्रपती उदयनराजे शिवेंद्रराजेंच्या भेटीला, दिलगिरीही व्यक्त केली; नेमकं काय घडलं?

Chhatrapati Udayanraje Bhosale Meet Chhatrapati Shivendraraje Bhosale: आज छत्रपती उदयनराजे यांनी छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली. या भेटीची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
Chhatrapati Udayanraje Bhosale Meet Chhatrapati Shivendraraje Bhosale
Chhatrapati Udayanraje Bhosale Meet Chhatrapati Shivendraraje BhosaleSaamtv

ओंकार कदम, सातारा|ता. ३० मार्च २०२४

Satara Loksabha Constituency News:

सातारा लोकसभा मतदार संघात महायुतीकडून छत्रपती उदयनराजे भोसले यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. भाजपकडून उद्याप उदयनराजेंच्या नावांची घोषणा झाली नसली तरी निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशातच आज छत्रपती उदयनराजे यांनी छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली. या भेटीची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

दोन्ही राजेंची भेट!

साताऱ्यामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले (Chhatrapati Udayanraje Bhosale) आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यामधील शितयुद्ध प्रसिद्ध आहे. मात्र लोकसभा निवडणुकीआधी दोन्ही राजे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. आज छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचा वाढदिवस असल्याने उदयनराजे भोसले यांनी त्यांची सुरूची बंगल्यावर भेट घेत जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

उदयनराजेंच्या हटके शुभेच्छा!

यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजेंना (Shivendraraje Bhosale) खास स्टाईलमध्ये गालावर पप्पी देत वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या. तसेच माझं कधी काही चुकलं‌ असेल तर दिलगिरी व्यक्त करतो असे म्हणत उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे यांच्या दिलजमाईसाठी प्रयत्नही केल्याचे पाहायला मिळाले.

Chhatrapati Udayanraje Bhosale Meet Chhatrapati Shivendraraje Bhosale
Kolhapur Lok Sabha: शाहू महाराजांच्या विजयासाठी उद्धव ठाकरे मैदानात; कोल्हापुरात घेणार जंगी सभा

लोकसभेच्या तोंडावर मनोमिलन?

छत्रपती उदयनराजे यांच्या भेटीनंतर राजेंना भारतीय जनता पक्षाने (BJP) लवकरात लवकर उमेदवारी द्यावी, आम्ही प्रचार करण्यासाठी तयार आहोत, अशी इच्छा छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केली. दरम्यान, साताऱ्याच्या राजकारणात शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांचा संघर्ष जुना आहे. त्यामुळेच ऐन लोकसभेच्या तोंडावर दोन्ही राजेंमध्ये झालेल्या झालेल्या या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Chhatrapati Udayanraje Bhosale Meet Chhatrapati Shivendraraje Bhosale
Maharashtra Lok Sabha Election : नाशिकच्या जागेवरून माहायुतीत तिढा? हेमंत गोडसेंनी थेट प्रचाराचा नारळच फोडला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com