Sanjay Dina Patil VS Mihir Kotecha From North East Mumbai Lok Sabha Constituency Saam tv
लोकसभा २०२४

North East Mumbai Constituency: ईशान्य मुंबईत मिहिर कोटेचा की संजय दिना पाटील? मतदार कोणाच्या गळ्यात घालणार खासदारकीची माळ?

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Update: Sanjay Dina Patil VS Mihir Kotecha: सलग १० वर्षे भाजपच्या हातात असलेला हा मतदारसंघ मिहिर कोटेचा राखून ठेवणार की ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यावर आपलं नाव कोरणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

Ruchika Jadhav

मुंबईतील ईशान्य मुंबई या मतदारसंघाकडे साऱ्या राज्याचं लक्ष वेधलं आहे. 4 जून रोजी लागणाऱ्या निकालात कोण जिंकणार आणि कोण हारणार याचीच चर्चा होताना दिसतेय. ईशान्य मुंबई मतदारसंघामध्ये ठाकरे गट विरुद्ध भाजप अशी तगडी लढत झाली आहे.

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांच्या विरुद्ध भाजपचे मिहिर कोटेचा रिंगणात आहेत. कधी भाजप तर कधी काँग्रेसला साथ देणारा मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात आहे. कारण दोन टर्म या जागेवरून भाजपचाच उमेदवार निवडून आलाय. गेली 10 वर्षे येथे भाजपचाच खासदार आहे.

ईशान्य मुंबईत सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यात मुलुंड, विक्रोळी, भांडूप पश्चिम, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व आणि मानखुर्द शिवाजी नगर, ईशान्य मुंबई हा मतदारसंघ खुल्या प्रवर्गात मोडतो.

2014 आणि 2019 मधील राजकीय परिस्थिती

2014 साली ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपचे किरीट सोमय्या आणि राष्ट्रवादीचे संजय पाटील रिंगणात होते. भाजपच्या किरीट सोमय्या यांना ५ लाख २५ हजार २८५ मतं मिळाली होती. तर राष्ट्रवादीच्या संजय पाटील यांना 2 लाख 08 हजार 163 मतं मिळाली होती. सोमय्या यांनी तब्बल 3 लाख 16 हजार मतांनी राष्ट्रवादीच्या पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2019 साली भाजपने उमेदवार बदलला. भाजपने नगरसेवक उदय कोटक यांना उमेदवारी जाहीर केली होती. कोटक यांनी पाटील यांचा तब्बल सव्वा दोन लाख मताधिक्क्यांनी पराभव केला होता.

शिवसेना पक्षातील फुटीनंतरचं राजकारण कसंय?

दोन्ही लोकसभेला ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून मतदाराने युतीला कौल दिलाय. दोन्ही वेळेला लोकसभा निवडणूक ही शिवसेना आणि भाजपने युतीतच लढली होती. मात्र आता एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडानंतर ठाकरे गट वेगळा झाला आहे आणि ठाकरे विरुद्ध भाजप अशी लढत या मतदारसंघात रंगली आहे. त्यामुळे सलग १० वर्षे भाजपच्या हातात असलेला हा मतदारसंघ मिहिर कोटेचा राखून ठेवणार की ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यावर आपलं नाव कोरणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO 3.0: ईपीएफओमध्ये मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा? ऑनलाइन अन् ऑफलाइन स्टेप बाय स्टेप प्रोसेस वाचा

Bharat Gogawale emotional reaction: महाराष्ट्राने निर्भीड व्यक्तीमत्त्व गमावलं, दादांच्या निधनाने मंत्री भरत गोगावले भावूक

Tirgrahi Yog: 200 वर्षांनंतर या राशींवर पडणार पैशांचा पाऊस; त्रिग्रही राजयोगाने होणार मालामाल

Ajit Pawar death News LIVE Updates : अजित पवारांच्या निधनानंतर मुलगा पार्थ पवार, सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल दिल्लीतून रवाना

Ajit Pawar Death: अजित पवारांचे विमान कसं कोसळलं? प्रत्यक्षदर्शीने सांगितला अपघाताचा थरार; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT