nilesh sambre says congress will choose me bhiwandi lok sabha candidate Saam Digital
लोकसभा २०२४

Bhiwandi Constituency : काॅंग्रेसकडून माझी उमेदवारी अंतिम, मध्येच कोणीतरी सुपारी घेऊन बाळ्या मामाचा बळी दिला : निलेश सांबरे

Nilesh Sambre Latest Marathi News : निलेश सांबरे यांनी आज त्यांच्या आईला सोबत घेऊन भिवंडी लाेकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Siddharth Latkar

- फय्याज शेख

Bhiwandi Lok Sabha Election :

भिवंडी लाेकसभा मतदारसंघातून आज (मंगळवार) जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे (nilesh sambre) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर माध्यमांशी बाेलताना सांबरे यांनी काॅंग्रेसकडून माझी उमेदवारी जाहीर हाेती मात्र कोणी तरी सुपारी घेऊन बाळ्या मामाचा बळी दिल्याचे नमूद केले. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

निलेश सांबरे यांनी आज त्यांच्या आईला सोबत घेऊन भिवंडी लाेकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी वंचित बहूजन आघाडी व खान्देश सेना यांनी देखील सांबरे यांच्या रॅलीत सहभाग नाेंदवित पाठिंबा दर्शविला.

निलेश सांबरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले काँग्रेस सोबत बोलणं चाललं आहे. जर एबी फॉर्म मिळाला तर मी काँग्रेसकडून उमेदवारी लढणार असल्याचा दावा सांबरे यांनी केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काॅंग्रेसकडून माझी उमेदवारी अंतिम हाेती मात्र मध्येच कोणी तरी सुपारी घेऊन बाळ्या मामाचा बळी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे या लोकसभा मतदारसंघात आहेच काय? जे काँग्रेसचे नगरसेवक घेतले आहे त्यांचे अस्तित्व नाही अशी टिप्पणी देखील सांबरे यांनी केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT