nilesh sambre criticizes kapil patil balya mama and sharad pawar bhiwandi lok sabha election 2024  Saam Digital
लोकसभा २०२४

Bhiwandi Constituency: राष्ट्रवादीने काँग्रेसला संपवण्याची सुपारी घेतली, निलेश सांबरेंचा शरद पवार गटावर निशाणा

शांतीनगर रहिमतपूर या भागात निलेश सांबरे यांच्या प्रचारासाठी सभा झाली. यावेळी समाजवादी पक्ष,पिस पार्टी या पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जिजाऊ विकास पार्टी मध्ये प्रवेश केला.

Siddharth Latkar

- फय्याज शेख

बाळ्या मामा, कपिल पाटील हे बी टीम आहेत तर राष्ट्रवादीने (ज्येष्ठ नेते शरद पवार गट) काँग्रेस पक्ष संपवण्याची सुपारी घेतल्याचा दावा भिवंडी लाेकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले निलेश सांबरे यांनी केला आहे. जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार सांबरे यांची शांतीनगर रहिमतपूर परिसरात प्रचार रॅली झाली. त्यानंतर माध्यमांशी बाेलताना सांबरे यांनी नेत्यांवर टीका केली. (Maharashtra News)

शांतीनगर रहिमतपूर या भागात निलेश सांबरे यांच्या प्रचारासाठी सभा झाली. यावेळी समाजवादी पक्ष,पिस पार्टी या पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जिजाऊ विकास पार्टी मध्ये प्रवेश केला. या सभेसाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निलेश सांबरे म्हणाले माझ्यावर आराेप करणारे हे सर्व जण बी टीम आहेत. राष्ट्रवादीचे बाळ्या मामा हे भाजपाचे कपिल पाटील यांची बी टीम आहे. काँग्रेसला संपवण्याची सुपारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घेतल्याची टीका सांबरे यांनी केली.

ते म्हणाले मी पहिल्यापासून काँग्रेस विचाराचा आहे. काॅंग्रेस कार्यकर्ता म्हणून माझी सुरुवात झाली आहे. सन 2013 पर्यंत जिल्हा जनरल सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहे.

सांबरे म्हणाले राजकारणी लोक ही फार मोठी असल्याचा भासवताहेत. कपिल पाटील मंत्री असल्यामुळे फार मोठे आहेत, बाळ्या मामा आठ पक्ष बदलून आला म्हणून मोठा आहे हा चुकीचा समज आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जे लोक आपल्या तालुक्याचे होत नाहीत. समाजाचे होत नाहीत. गावाचे होत नाही ते कुठे मोठे आलेत. कपिल पाटील केंद्रीय मंत्री झाल्यानंतर त्यांनी या शहरासाठी तालुक्यासाठी केंद्रीय विद्यालय आणायला हवे होते. रेल्वे समस्या सोडवायला हव्या होत्या. येथील समस्या जितेंद्र आव्हाड नाही सुधरवणार त्यांनी फक्त मुस्लिम मतांचा फक्त वापर केल्याची टीका सांबरेंनी आव्हाडांवर केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : दिवसभरात आर्थिक चणचण भासणार, प्रेमामध्ये अपयश मिळणार; ५ राशींच्या लोकांचं टेन्शन वाढणार

Gajkesri Rajyog 2025: 22 जुलैला बनणार पॉवरफुल गजकेसरी राजयोग; 'या' ३ राशींना मिळणार पैसाच पैसा

Akola News : कापसाच्या सघन लागवडीचा 'अकोला पॅटर्न'; 'सघन' पद्धत आणि पारंपारिक पद्धतमधील फरक काय?

Maharashtra Politics: राजकारणात नवा ट्विस्ट: उद्धव-राज युतीवर सस्पेन्स कायम, शिंदेंची नजर

Ramdas Athawale: महाराष्ट्रात दादागिरी चालणार नाही; मराठीच्या मुद्द्यावरून रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना ठणकावलं

SCROLL FOR NEXT