Sakshi Sunil Jadhav
नातं म्हणजे फक्त एकत्र राहणं नाही, तर परस्पर समज, आदर आणि प्रेमावर उभं असलेलं नाजूक बंधन असतं. बदलत्या जीवनशैलीत अनेक नात्यांमध्ये संवाद कमी झालेला असतो. मात्र काही सोप्या सवयी अंगीकारल्यास नातं जास्त मजबूत बनू शकतं.
नात्याची सर्वात मजबूत पायाभरणी म्हणजे प्रामाणिकपणा. लहानसं खोटंसुद्धा विश्वासाला तडा देऊ शकतं. त्यामुळे नेहमीच सचोटीने वागा.
पार्टनरच्या भावना दुर्लक्षित करू नका. त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेणं आणि समजून घेणं नातं मैत्री घट्ट होते.
I Love You म्हणणं सोपं आहे, पण ते कृतीतून दाखवणं त्याहून महत्वाचं आणि कठीण आहे. वेळ देणं, मदत करणं आणि काळजी घेणं हे खऱ्या प्रेमाचं लक्षण आहे.
तुमच्या बीझी लाईफमधून एकमेकांसाठी वेळ काढणं गरजेचं आहे. रोज किमान अर्धा तास बोलणं तुमच्यातला दूरावा दूर करले.
नात्यातले अनेक वाद न बोलण्यामुळे निर्माण होतात. सुख-दुःख, अडचणी आणि आनंदाचे क्षण एकमेकांशी शेअर करा.
एकत्र हसणं, छंद जोपासणं, छोटे सरप्राइज देणं नात्यात गोडवा निर्माण करतं.
ईगो म्हणजे नात्याचा सर्वात मोठा शत्रू. रागाच्या भरात बोललेले शब्द नातं दुखावू शकतात, त्यामुळे संयम ठेवा.
चुका होणं स्वाभाविक आहे. माफी मागणं आणि माफ करणं या दोन्ही गोष्टी नात्याला पुढे नेण्याची ताकद देतात.