Nashik Teacher Constituency News:  Saamtv
लोकसभा २०२४

Nashik News: विखे पाटलांची एन्ट्री, शुभांगी पाटीलही बंडखोरीच्या तयारीत; नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत रंगणार चढाओढ!

Nashik Teacher Constituency News: नाशिक शिक्षक मतदार संघात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत असून विवेक कोल्हे यांच्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील यांनीही अपक्ष अर्ज दाखल केल्याने रंगत वाढली आहे.

अभिजीत सोनावणे

नाशिक|ता. ३ जून २०२४

लोकसभा निवडणुकांनंतर राज्यात शिक्षक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. विधानपरिषदेच्या चार जागांसाठी २६ जून रोजी मतदान होणार आहे. नाशिक शिक्षक मतदार संघात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत असून विवेक कोल्हे यांच्यानंतर आता राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे पाटीलही निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघात मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षाचे नेते विवेक कोल्हे यांनी शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी अपक्ष अर्ज दाखल केला होता. त्यानंतर आता जप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे पाटीलही शिक्षक मतदासंघ निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

विवेक कोल्हे यांच्यानंतर आता राजेंद्र विखे पाटीलही अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. तसेच काँग्रेसच्या संदीप गुळवे यांनी ठाकरे गटात प्रवेश करून उमेदवारी मिळवल्याने ठाकरे गटाच्या शुभांगी पाटील बंडखोरीच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, शिक्षक पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवार असलेल्या सत्यजित तांबे यांना ठाकरे गटाच्या शुभांगी पाटील यांनी कडवी झुंज दिली होती. त्यानंतर आता शुभांगी पाटील यांनी शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी अर्ज घेतल्याने चुरस वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19: बिग बॉस १९ ने केली टॉप ९ स्पर्धकांची घोषणा; या आठवड्यात कोणाला दाखवणार बाहेरचा रस्ता

Maharashtra Live News Update: बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून पाहिलं नाही- राज ठाकरेंची पोस्ट

Shocking: नर्सिंगच्या विद्यार्थिनीनं संपवलं आयुष्य, हॉस्टेलच्या टॉयलेटमध्ये घेतला गळफास

Rumali Roti : घरच्या घरी बनवा रेस्टॉरेंट सारखी रुमाली रोटी

Ladki Bahin Yojana: निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना खुशखबर मिळणार! सरकार २ महत्त्वाचे निर्णय घेणार

SCROLL FOR NEXT