Abdul Sattar On Hemant Godse Saam Tv
लोकसभा २०२४

Abdul Sattar On Hemant Godse: नाशिकमध्ये हेमंत गोडसेंची उमेदवारी फायनल, अब्दुल सत्तार यांचा दावा

Nashik Loksabha Election 2024 : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी नाशिकमध्ये लोकसभेची उमेदवारी हेमंत गोडसे यांनाच मिळणार असल्याचा दावा केला आहे.

Priya More

संदीप नागरे, हिंगोली

नाशिक लोकसभा मतदारसंघात (Nashik Loksabha Election 2024) महायुतीकडून (Mahayuti) अद्याप उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली नाही. शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये धुसपूस पाहायला मिळत आहे. आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी हेमंत गोडसे मुंबईमध्ये ठाण मांडून बसले आहेत. मात्र अद्याप नाशिकच्या जागेचा तिढा सुटलेला नाही. अशामध्ये शिवसेनेचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी नाशिकमध्ये लोकसभेची उमेदवारी हेमंत गोडसे यांनाच मिळणार असल्याचा दावा केला आहे. आज हिंगोलीत महायुतीच्या प्रचारासाठी अब्दुल सत्तार आले होते. यावेळी साम टीव्हीशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

'नाशिकच्या जागेवर हेमंत गोडसे हेच महायुतीचे फायनल उमेदवार असतील. भावना गवळी, हेमंत पाटील यांच्यावर जशी वेळी आली तशी वेळ हेमंत गोडसे यांच्यावर येणार नाही.', असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले. यावेळी अब्दुल सत्तार यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. खोटारड्या लोकांची लंका जाळण्यासाठी बाहेर निघालो. या विधानावर खोटारडी नेमके कोण आहेत? हे संजय राऊतच सांगू शकतात. असे अब्दुल सत्तार म्हणाले.

उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगाने जय भवानी शब्द काढून टाका, अशी नोटीस दिली. यावर अब्दुल सत्तार म्हणाले, जय भवानीबद्दल मला देखील आदर पण निवडणूक आयोगाचे हे काम आहे. निवडणूक आयोग सर्व बाबी तपासत असतो. विरोधकांवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांचा मनसेने मनोरुग्णाचा फॉर्म भरला आहे. यावर बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, 'संजय राऊत स्वतःच्या मनाचं काही बोलत नाहीत. त्यांना सांगणारे दुसरेच आहेत. तरी त्यांनी तोल सांभाळून बोललं पाहिजे.', असा सल्ला त्यांनी दिला आहे.

दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघामधून अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी माघार घेतली. त्यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली होती. नाशिक लोकसभा निवडणुकीतून छगन भुजबळ यांनी माघार घेतल्यामुळे हेमंत गोडसेंची उमेदवारी निश्चित झाली असे म्हटले जात आहे. पण अद्याप महायुतीकडून या मतदारसंघातील उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले नाही. त्यामुळे या मतदारसंघाचा तिढा अद्याप काही सुटलेला नाही. या मतदारसंघातील उमेदवाराचे नाव लवकर घोषित करावे असा सल्ला छगन भुजबळ यांनी देखील दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना १० टक्के मोफत वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा

अश्लील मेसेज, व्हिडिओ पाठवले अन्..., कोल्हापूरच्या भाजप आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवलं?

लाडक्या बहीण'साठी आनंदाची बातमी, काही तासात खात्यावर ₹१५०० येणार

Nankhatai Recipe : दिवाळीत लहान मुलांसाठी खास बनवा खुसखुशीत नानकटाई, तोंडात टाकताच विरघळेल

Katrina Kaif Pregnancy : "मुलगा असेल की मुलगी असेल गं?" कतरिना कैफच्या प्रेग्नेंसी बद्दल ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी

SCROLL FOR NEXT