Dilip Khaire And Chhagan Bhujabal  Saam Tv
लोकसभा २०२४

Nashik Election : नाशिकचा तिढा सुटला, पण वेढा कायम!; भुजबळ समर्थक नाराज, समता परिषदेनं उमेदवाराचं नावच सांगितलं

Nashik Lok Sabha Constituency: समता परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप खैरे (Dilip Khaire) हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून ते अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Priya More

तबरेज शेख, नाशिक

नाशिक लोकसभा मतदारसंघातील (Nashik Lok Sabha Constituency) जागा वाटपावरून महायुतीमध्ये असलेला तिढा अखेर आज सुटला. महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाच्या हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले असले तरी देखील छगन भुजबळ (Chhagan Bhujabal) यांचे समर्थक नाराज झाले आहेत. नाशिकमध्ये उमेदवारी मिळावी यासाठी समता परिषदेचे पदाधिकारी ठाम आहेत. अशामध्ये आता समता परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप खैरे (Dilip Khaire) हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून ते अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

छगन भुजबळांसोबत गिरीश महाजन आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची बैठक झाली. ही बैठक होऊनही भुजबळ समर्थक उमेदवारीवर ठाम आहेत. छगन भुजबळ निवडणूक रिंगणात नसल्याने समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी कायम आहे. ३ मे रोजी नाशिकमध्ये समता परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप खैरे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दिलीप खैरे हे छगन भुजबळांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. आता ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत. मोदींसाठी सर्वांची नाराजी दूर केली जाईल अशी प्रतिक्रिया भुजबळ देत असले तरी समर्थक उमेदवारीवर ठाम आहेत.

अशामध्ये आज हेमंत गोडसे यांना नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाली असली तरी देखील समता परिषद उमेदवारीवर ठाम आहेत. त्यामुळे जर दिलीप खैरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर नाशिकमध्ये चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून हेमंत गोडसे, महाविकास आघाडीकडून राजाभाऊ वाजे, अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज आणि ३ मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणारे दिलीप खैरे यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता आहे. पण नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये प्रमुख लढत हेमंत गोडसे आणि राजाभाऊ वाजे यांच्यामध्ये होणार आहे.

दरम्यान, हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, हेमंत गोडसे यांचे नाव अपेक्षित आहे. हेमंत गोडसे सध्या सीटिंग एमपी आहेत. ते खासदार आहेत. त्यांचा आग्रह मुख्यमंत्री शिंदे साहेबांनीसुद्धा केला होता.हेमंत गोडसे यांचे मनापासून अभिनंदन करतो. आतापासूनच प्रचाराची सुरुवात वेगात होईल. भारती पवार आणि हेमंत गोडसे यांचा फॉर्म भरण्याचा कार्यक्रम उद्या होईल. यावेळी देवेंद्र फडणवीस किंवा इतर काही नेते येण्याची शक्यता आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला

SCROLL FOR NEXT