Lok Sabha Election Result Saam tv
लोकसभा २०२४

Lok Sabha Election Result : नंदुरबारमध्ये काँग्रेसचे पाडवी आघाडीवर, रावेरमधून रक्षा खडसेंची आघाडी

Jalgaon Nandurbar News : लोकसभेसाठी झालेल्या मतदान प्रक्रियेनंतर आज मतमोजणी होत असून यात हॅट्रिक होणार कि सत्तांतर होणार याकडे लक्ष लागून आहे. सकाळी ८ वाजेपासून निकाल येण्यास सुरवात झाली असून मतमोजणीच्या दुसऱ्या फेरी देखील पूर्ण झाल्या आहेत

Rajesh Sonwane

जळगाव/ नंदुरबार : लोकसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणीची प्रक्रिया होत आहे. मतमोजणीची दुसरी फेरी झाली असून यात नंदुरबार मतदार संघातून भाजपच्या विद्यमान खासदार हिना गावित पिछाडीवर असून काँग्रेसचे गोवाल पाडवी हे आघाडीवर आहेत. तर जळगावच्या रावेर व जळगाव मतदार संघातून भाजपचे दोन्ही उमेदवार आघाडीवर आहेत. 

लोकसभेसाठी (Lok Sabha Election) झालेल्या मतदान प्रक्रियेनंतर आज मतमोजणी होत असून यात हॅट्रिक होणार कि सत्तांतर होणार याकडे लक्ष लागून आहे. सकाळी ८ वाजेपासून निकाल येण्यास सुरवात झाली असून मतमोजणीच्या दुसऱ्या फेरी देखील पूर्ण झाल्या आहेत. यात (Jalgaon) जळगाव जिल्ह्यातील जळगाव लोकसभा मतदार संघातून भाजपच्या स्मिता वाघ व महाविकास आघाडीचे करण पवार यांच्या सरळ लढत आहे. यात स्मिता वाघ यांनी दुसऱ्या फेरी अखेर आघाडी घेतली आहे. 

नंदुरबारमध्ये विद्यमान खासदार पिछाडीवर 

नंदुरबारच्या (Nandurbar) मतदार संघात भाजपच्या विद्यमान खासदार हिना गावित यांच्या विरोधात पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले काँग्रेसचे गोवाल पाडवी उभे होते. मात्र गोवळ पाडवी हे दुसऱ्या फेरीअखेर ३२ हजार मतांनी आघाडीवर राहिले असून भाजपच्या हिना गावित पिछाडीवर आहेत. 

रक्षा खरडसेंची आघाडी 

जळगाव : रावेर लोकसभा मतदार संघातील भाजपच्या उमेदवार (Raksha Khadse) रक्षा खडसे यांचा विजय निश्चित मानला जात असून त्यांना दुसऱ्या फेरी अखेर १२ हजाराच्या वर मत मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीचे श्रीराम पाटील यांना ८ हजार मते मिळाली आहेत. दरम्यान रक्षा खडसे यांनीं जळगाव मधील ओंकारेश्वर मंदिरात देवदर्शन घेतले. यानंतर त्या मतमोजणीच्या ठिकाणी रवाना होणार आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aditya Roy Kapoor : व्हायचं होतं क्रिकेटर, झाला अभिनेता; एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले

Sangli Politics: बंटी पाटलांसारखं वागलो तर जिल्ह्यात एकही पक्ष शिल्लक राहणार नाही, विश्वजीत कदम यांनी पवारांच्या राष्ट्रवादीला खडसावलं

Maharashtra Election : टपाली मतपत्रिकेचा फोटो गावाकडं व्हॅट्सअॅप पाठवला, पोलिसावर गुन्हा दाखल

Weight And Height Chart: तुमच्या उंचीनुसार तुमचं वजन किती असलं पाहिजे? पाहा संपूर्ण चार्ट

Bank Job: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर होण्याची सुवर्णसंधी; ५९२ पदांसाठी भरती, पात्रता काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT