Amravati News
Amravati NewsSaam tv

Amravati News : केवायसी न केल्यामुळे पीक नुकसानीचे ६४ कोटी रुपये शासनाकडेच; अमरावती जिल्ह्यातील चित्र

Amravati News : अमरावती जिल्ह्यात गेल्या खरीप व रब्बी हंगामामध्ये अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीटी सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणा नुकसान झाले होते
Published on

अमर घटारे 
अमरावती
: खरीप व रब्बी हंगामात झालेल्या पीक नुकसानीची भरपाई म्हणून शासनाकडून मदतीची घोषणा करण्यात आली होती. हा मदत निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार होता. मात्र शेतकऱ्यांनी बँक खाते केवायसी न केल्यामुळे निधी मिळू शकलेला नाही. 

Amravati News
Majalgaon News : चढ्या भावाने कपाशी बियाणांची विक्री; माजलगावमध्ये दुकानदारावर गुन्हा दाखल

अमरावती (Amravati) जिल्ह्यात गेल्या खरीप व रब्बी हंगामामध्ये अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीटी सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणा नुकसान झाले होते. यासाठी शासनाने एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे तर कधी निकषा बाहेर जाऊन निधी उपलब्ध केला. मात्र आता अनुदान हे तालुकास्तरावर नव्हे तर शासन स्तरावरून शेतकऱ्यांच्या (Bank) बँक खात्यामध्ये जमा होत आहे. मात्र अमरावती जिल्ह्यातील आतापर्यंत ८४ हजार ९७० शेतकऱ्यांनी केवायसीची प्रक्रिया केलेली नाही.  

Amravati News
Dhule Temperature : धुळ्यात तापमानाचा पारा वाढलेलाच; तापमान ४२.५ अंशांवर

बँक खात्याचे केवायसी न केल्याने कोणतेही व्यवहार बँकेत होत नाहीत. परिणामी शासनाकडून येणार मदत निधी देखील अडकलेला आहे. अमरावती जिल्ह्यातील (Farmer) शेतकऱ्यांचा साधारण ६४ कोटी ६१ लाख १५ हजार ८३५  रुपयाचा निधी शासनाकडे पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत तो निधी मिळाला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com