Rahul Shewale vs Anil Desai Saam TV
लोकसभा २०२४

South Central Mumbai Lok Sabha: दक्षिण मध्य मुंबईत ठाकरे विरुद्ध शिंदेंची थेट लढत; कोण मारणार बाजी?

Mumbai Lok Sabha Election 2024 Result Battle in Between Rahul Shewale vs Anil Desai: मुंबईमधील दक्षिण मध्य मतदारसंघ चांगलाच चर्चेत आलाय. या मतदासंघात ठाकरे विरुद्ध शिंदे अशी थेट लढत रंगली आहे.

Ruchika Jadhav

4 जूनला लोकसभा निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत. त्यात मुंबईमधील दक्षिण मध्य मतदारसंघ चांगलाच चर्चेत आलाय. या मतदासंघात ठाकरे विरुद्ध शिंदे अशी थेट लढत रंगली आहे. शनिवारी निकालाआधीचे एक्झीट पोल देखील समोर आले. यामध्ये महायुती पुढे ठाकरे आणि शरद पवार गटाला मतदारांची सहानुभूती मिळाल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता कोण विजयाचा मनाचा तुरा आपल्या डोक्यावर रोवणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात राहुल शेवाळे (शिंदे गट) विरुद्ध अनिल देसाई (ठाकरे गट) हे उमेदवार रिंगणात आहेत. गेल्या २५ वर्षांत या मतदारसंघात शिवसेनेचं वर्चस्व राहिलं आहे. फक्त साल २००९ मध्ये मनसेने उमेदवारी दिल्याने या मतदारसंघात शिवसेनेचे तत्कालिन उमेदवार सुरेश अनंत गंभीर यांचा पराभव झाला आणि काँग्रेसचे एकनाथ गायकवाड हे निवडून आले होते.

२०१९ मध्ये काय परिस्थिती होती?

त्यानंतर २०१४ आणि २०१९ च्या लोकसभेत सलग शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांनी बाजी मारली आहे. २०१९ साली शिवसेनेने शेवाळे यांना तर काँग्रेसने गायकवाड यांना उमेदवारी दिली होती. यावेळी शेवाळे यांना ४ लाख २४ हजार ९१३ मतं मिळाली. तर गायकवाड यांना २ लाख ७२ हजार ७७४ मतं मिळाली. तब्बल १ लाख ५२ हजार १३९ मताधिक्क्यांनी शेवाळे यांनी गायकवाड यांचा पराभव केला.

पक्षातील फुटीनंतरचं राजकारण कसंय?

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेतून काही खासदार बाहेर पडले. त्यांचं नेतृत्व करणारे खासदार होते राहुल शेवाळे. बंडखोरी केल्यानंतर शेवाळे शिवसेनेचे लोकसभेतले गटनेतेही झाले. शिंदे गटाची राजकीय भूमिका मांडण्यासाठीही शेवाळे कायम पुढे असतात त्यामुळे त्यांना शिंदे गटातून उमेदवारी मिळाली. मविआमध्ये जागावटपावेळी दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस देखील इच्छूक होती. वर्षा गायकवाड यांचे नाव तेव्हा चर्चेत आले होते. मात्र नंतर ही जागा ठाकरे गटाकडेच आली आणि मुंबई दक्षिणमध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे अशी लढत रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, माथेफिरू तरुणाला अटक; उत्तर प्रदेश कनेक्शन उघड

Palghar : पालघरमधील एमआयडीसीत कंपनीला भीषण आग | VIDEO

Maharashtra Live News Update : विदर्भातील सात जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा इशारा

Maggi History: मॅगीचा शोध कोणी लावला?

EPFO Balance: पीएफ अकाउंटमध्ये किती पैसे जमा झाले? मिस्ड कॉल, SMS वरुन चुटकीसरशी करा चेक

SCROLL FOR NEXT