Raj Thackeray Demands Saam Tv
लोकसभा २०२४

Raj Thackeray Demands: मुंबई-गोवा महामार्ग, रेल्वे अन् बरंच काही; भरसभेत राज ठाकरेंच्या PM मोदींकडे या महत्त्वाच्या मागण्या

Mumbai NDA Sabha: देशात तुम्ही (PM नरेंद्र मोदी) जसे उत्तम रस्ते बनवलेत, पण गेली २० वर्ष रखडलेला आमचा मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करून घ्यावा, असं मागणी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

Satish Kengar

Raj Thackeray News:

''देशात तुम्ही (पंतप्रधान नरेंद्र मोदी) जसे उत्तम रस्ते बनवलेत, पण गेली २० वर्ष रखडलेला आमचा मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करून घ्यावा'', असं मागणी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. आज शिवतीर्थावर महायुतीची सभा पार पडली. याच सभेत त्यांनीही मागणी केली आहे.

या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी मोदी यांच्याकडे मागणी केली की, ''शिवछत्रपतींची स्मारकं म्हणजे त्यांनी उभारलेले गडकिल्ले. या किल्ल्यांचं जतन करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष समिती नेमून लक्ष द्यावं.'' ते म्हणाले, ''जवळपास १२५ वर्ष या हिंदभूमीवर मराठा साम्राज्य होतं, त्याचा इतिहास देशातल्या प्रत्येक शालेय अभ्यासक्रमात समावेश व्हावा. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही जुनी मागणी आहे ती मागणी पूर्ण व्हावी.''

ठाकरे म्हणाले, ''तुम्ही तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास संविधान बदलणार, असं विरोधी पक्ष म्हणत आहेत, त्यांना तुम्ही उत्तर दिलंच आहे. तुम्ही संविधान बदलणार नाही हे मला माहीत आहेच, पण तुमच्याकडून पुन्हा एकदा देशाला आश्वस्त करा की, भारतीय संविधानाला धक्का लागणार नाही.''

ते म्हणाले, ''आज देशात अनेक चांगले-देशभक्त मुसलमान आहेत, जे देशाच्या प्रगतीत सहभागी होऊ इच्छितात त्यांना आश्वस्त करा, पण मोहल्ल्यांमध्ये राहणारे, ओवेसीसारख्यांच्या मागे फिरणारा जो मुसलमान आहे, त्यांच्या मोहल्ल्यांमध्ये आपले पोलीस घुसवून तिथे ज्या देशविघातक कारवाया सुरु आहेत, त्यावर कायमचा चाप बसवा.''

राज ठाकरे म्हणाले, ''शेवटची मागणी म्हणजे मुंबई रेल्वेच्या विकासाकडे लक्ष द्या, रेल्वेच्या फेऱ्या वाढवा, प्रवाशांना उत्तम सुविधा मिळावी म्हणून मुंबई रेल्वेला भरपूर निधी द्या.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT