Raj Thackeray: आधी कौतुक, मग सल्ले, नंतर थेट मागणीच केली; भरसभेत PM मोदींसमोर काय म्हणाले राज ठाकरे?

Mumbai NDA Sabha: आज शिवतीर्थावर महायुतीची सभा पार पडली. या सभेत पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसले. यावेळी सभेला संबोधित करताना राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करत त्यांना काही सल्लेही दिले.
आधी कौतुक, मग सल्ले, नंतर थेट मागणीच केली; भरसभेत PM मोदींसमोर काय म्हणाले राज ठाकरे?
Raj Thackeray on PM ModiSaam Tv

Raj Thackeray On PM Modi:

आज शिवतीर्थावर महायुतीची सभा पार पडली. या सभेत पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसले. यावेळी सभेला संबोधित करताना राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करत त्यांना काही सल्लेही दिले आहेत आणि काही मागण्याही केल्या आहेत.

या सभेत आपल्या भाषणाची सुरुवात करताना राज ठाकरे म्हणाले की, ''पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणारे नरेंद्र मोदी हे बरोबर २१ वर्षांनी शिवतीर्थावर आलात. त्यावेळेस आपण कमळातून बाहेर आला होतात आणि २०१४ ला आपण कमळाला बाहेर काढलंत.''

आधी कौतुक, मग सल्ले, नंतर थेट मागणीच केली; भरसभेत PM मोदींसमोर काय म्हणाले राज ठाकरे?
INDIA Alliance: मोठा भाई, छोटा भाई, ४ तारखेनंतर कोणीही राहत नाही; भाजपवर संजय राऊतांची मिश्किल टीका

ते म्हणाले, ''२०१४-२०१९ च्या मोदीजींच्या कार्यकाळाबद्दल मला जे बोलायचं होतं ते मी २०१९ ला बोललो. आता २०१९ ते आत्तापर्यंतचं बोलूया. इथल्या वक्त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका करून वेळ वाया घालवले. माझ्या मते त्यांच्याबद्दल बोलून काही उपयोग नाही. कारण ते सत्तेत येणार नाही. पण २०१९ ते २०२४ काळात मोदीजींनी जी कामं केली त्याबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छितो.''

'...म्हणून अयोध्येत राम मंदिर उभं राहिलं'

राज ठाकरे म्हणाले, ''मोदीजी तुम्ही होतात म्हणून अयोध्येत राम मंदिर उभं राहिलं. काश्मीरला विशेष दर्जा देणारा ३७० कलम तुमच्यामुळेच हटवलं गेलं. काश्मीर भारताचा भाग आहे हे ३७० कलम घटनेनंतर भारतीयांना पहिल्यांदा वाटू लागले.''

आधी कौतुक, मग सल्ले, नंतर थेट मागणीच केली; भरसभेत PM मोदींसमोर काय म्हणाले राज ठाकरे?
Ajit Pawar Speech Dadar: २० तारखेला विरोधकांना त्यांची जागा दाखवून देऊ, अजित पवारांचा निर्धार

ते म्हणाले, ''शाहबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पोटगीच्या बाजूने न्याय दिला होता, पण राजीव गांधींनी कायदा संमत करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला. पण मोदीजींनी याच पीडित मुस्लिम महिलांना ट्रिपल तलाकमधून बाहेर काढलं, त्यांच्यावर जो अन्याय होतोय, तो अन्याय कायमचा दूर झाला.''

या केल्या मागण्या

दरम्यान, राज ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधान मोदींना मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली आहे. तसेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशीही मागणी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com