Raj Thackeray MNS Gudi Padwa Melava 
लोकसभा २०२४

MNS Gudi Padwa Melava: लोकसभेसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा, विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा; राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आदेश

MNS Melava: आगामी लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंची राजकीय भूमिका आणि मनसेची यापुढची दिशा काय असेल? या प्रश्नांची उत्तरं याच गुढीपाडवा मेळाव्यात मिळणार आहेत.

Bharat Jadhav

MNS Gudi Padwa Melava Raj Thackeray Speech:

गुढी पाडाव्याच्या मेळाव्यात आपण लोकसभेसाठी महायुतीला पाठिंबा दिलाय. यंदाची निवडणूक ही देशाचं भवितव्य घडणारी आहे, असं म्हणत राज ठाकरे यांनी आपण लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं. परंतु विधानसभेला कामाला लागा असे आदेश राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात दिलेत. (Latest News)

गुढी पाडाव्याच्या मेळाव्यात लोकसभेसाठी महायुतीला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा देत कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश त्यांनी दिलेत. गुढी पाडव्याच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे लोकसभा निवडणुकीसंदर्भात काय भूमिका घेणार याची उत्सुकता लागली होती.आज पार पडलेल्या मेळाव्यात मनसैनिकांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिलेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मेळाव्याला आलेल्या राज्यभरातील कार्यकर्त्यांना मला एकच गोष्ट सांगायची आहे, तुम्ही आता विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा. पुढील बाकीच्या गोष्टी पुढे आता विधानसभेसाठी मोर्चेबांधणी करणं आवश्यक आहे. त्यामुळे कामाला लागा.या तयारीसाठी आपण तुम्हाला भेटण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात येणार आहे. मला येथे जे काही मांडायचं होतं हे मी मांडलं आहे, उद्या अजून कोणाची पक्क पक्क झाली तर अजून माझ्या घराची दारं, खिडक्या चर्चेसाठी उघडी आहेत, असं राज ठाकरे म्हणालेत.

यंदाची निवडणूक ही देशाचं भवितव्य घडणारी आहे,असं म्हणत राज ठाकरे यांनी आपण लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं. 'मी नरेंद्र मोदीं यांच्यासाठी महायुतीला पाठिंबा देत असल्याचं ते म्हणाले. २०१४ च्या निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान व्हावेत असं मी सांगितले होते. त्यानंतर आता आपण मोदींसाठी महायुतीला पाठिंबा दिल्याचं ते म्हणाले.देशाला आणि पुढच्या काही भवितव्यसाठी एक खंबीर नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे आपण मोदींसाठी पाठिंबा देत आहे. राज्यभरातून आलेल्या मनसे कार्यकर्त्यांना माझी हात जोडून विनंती आहे, राज्यात ज्याप्रकारे गोष्टी झाल्यात तशा गोष्टींच्या व्याभिचारांना राजमान्यता देऊ नका.

ज्या प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रात चालू आहे. याला राज मान्यता दिली तर ती पुढे मिळत गेली तर मग पुढचे दिवस भीषण आहेत. लोकसभेच्या निवडणुकीसाठी हाणाारी चालू आहेत. पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी तर कोथळे बाहेर काढतील. हे का होतय कारण महाराष्ट्रात राजकारणाचा कॅरम चुकीचा फुटलाय, कोण कोणाच्या पक्षात आहेच कळत नसल्याची टीका सुद्धा यावेळी राज ठाकरेंनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT