Sandip Deshpande Saam Tv
लोकसभा २०२४

Maharshtra Politics: राजसाहेब पक्षहिताचा निर्णय घेतील, राज ठाकरेंच्या दिल्लीवारीवर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया

Sandip Deshpande On Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीला गेले आहेत. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Rohini Gudaghe

Raj Thackeray Delhi Visit Lok Sabha 2024

लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे आता सर्वच पक्षांच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) दिल्लीला गेले आहेत. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे दिल्लीला का गेलेत? हे काही तासांतच स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया दिली आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया पुन्हा उंचावल्या आहेत. (latest politics news)

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितलं की, राज ठाकरे जो निर्णय घेतील तो हिंदुत्वाचा, महाराष्ट्राचा आणि पक्षाच्या हिताचा (Lok Sabha 2024) असेल. बाळा नांदगावकर आमचे ज्येष्ठ नेते आहेत. ते दिल्लीत गेलेत तर आम्हाला आनंद होईल, अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज ठाकरेंचा दिल्ली दौरा

संदीप देशपांडे म्हणाले की, आम्हाला राज ठाकरे जो आदेश देतील त्यानुसार आम्ही काम करू. कधी यश आलं तर कधी अपयश आलं, पण ते खचून गेले नाहीत. महाराष्ट्राच्या राजकारणात चिखल (Maharshtra Politics) झालाय, हे खरं आहे असंही ते म्हणाले. राज ठाकरे हित बघून निर्णय घेतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर महायुतीमध्ये जाणार वैगरे अशा बातम्या तुम्ही चालवत आहात, असं देशपांडे यांनी (MNS Activist Sandip Deshpande) माध्यमांशी बोलताना म्हटलंय. आम्हाला कोणतीही अट घातलेली नाही, असंही त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. राज ठाकरे यांचा हा दुसरा दिल्ली दौरा (Raj Thackeray Delhi Visit) आहे.

लोकसभा निवडणुकांचा तारखा जाहीर

आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेही आता रिंगणात उतरणार आहे. राज ठाकरे महायुतीसोबत जाणार असल्याची माहिती मिळतेय. मनसेकडून लोकसभेसाठी २ जागांची मागणी केली गेली (Sandip Deshpande On Raj Thackeray) आहे. या जागांचा प्रश्न सोडवण्यासाठी राज ठाकरे यांनी दिल्ली गाठली आहे. लोकसभा निवडणुकांचा तारखा जाहीर झाल्यानंतर देशात आचार संहिता लागू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Night Jasmine: घराच्या बागेत लावा पारिजातकाचं झाड, मनमोहक सुगंधाने बहरेल तुमची बाग

Saam Exit Poll : सावंत की पडळकर? मतदारांचा कौल कुणाला, पाहा एक्झिट पोल VIDEO

Arjuni Morgaon Exit Poll : अर्जुनी मोरगाव मतदारसंघात कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: औसामध्ये भाजपचे अभिमन्यू पवार होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra exit polls : माकप डहाणूचा गड राखणार का? कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT