Shreya Maskar
हिवाळ्यात चांगल्या आरोग्यासाठी हिरव्या भाज्या तसेच रानभाज्यांचा आस्वाद घ्या. ज्यामुळे शरीराला पोषक घटक मिळतील.
हिवाळ्यात गावाकडे बनवतात तसा तुरीच्या दाण्याचा झुणका हा एक चमचमीत पदार्थ आहे. जो विदर्भात प्रामुख्याने बनवला जातो.
तुरीच्या दाण्याचा झुणका बनवण्यासाठी तुरीचे दाणे, तेल, कांद्याची पात, कढीपत्ता, लसूण, हळद, लाल तिखट, टोमॅटो, मीठ आणि कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.
तुरीच्या दाण्याचा झुणका बनवण्यासाठी सर्वप्रथम हिरवे ताजे तुरीचे दाणे स्वच्छ धुवून कुकरला शिजवून घ्या.
त्यानंतर शिजवलेले दाणे मिक्सरमध्ये बारीक करा. जाडसर पेस्ट बनवून घ्या. गरमागरम भाकरीसोबत तुरीच्या दाण्याचा झुणका खूपच छान लागतो.
आता पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता, कांद्याची पात, लसूण टाकून चांगले परतून घ्या.
त्यानंतर यात लाल तिखट, हळद, टोमॅटो आणि चवीनुसार मीठ टाकून चांगले परता.
शेवटी यात तुरीच्या दाण्याची पेस्ट टाका आणि मंद आचेवर शिजवून घ्या. वरून यात हिरवीगार कोथिंबीर भुरभुरवा.