Shreya Maskar
रविवारी जेवणासाठी खास गावरान मेन्यू बनवा. तुम्ही यात गरमागरम भाकरी आणि चवळीची रस्सा भाजी यांचा समावेश करू शकता.
चवळीची रस्सा भाजी बनवण्यासाठी चवळी, कांदा, टोमॅटो, आले-लसूण पेस्ट, कढीपत्ता, खोबरे, मोहरी, हळद, तिखट, धने पावडर, जिरे पावडर, गोडा मसाला, मीठ, कोथिंबीर आणि तेल इत्यादी साहित्य लागते.
चवळीची रस्सा भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम भिजवलेली चवळी कुकरमध्ये थोडे मीठ आणि पाणी टाकून शिजवून घ्या. चवळी जास्त भातासारखी मऊ करू नका.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता आणि चिरलेला कांदा गोल्डन फ्राय करा. यात आले-लसूण पेस्ट, टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा.
त्यानंतर मिश्रणात खडे मसाले,हळद, तिखट, धने-जिरे पावडर आणि गोडा मसाला घालून चांगले मिक्स करा. तुम्ही यात आवडीचे इतर मसाले देखील टाकू शकता.
त्यानंतर भाजीमध्ये किसलेले फ्रेश खोबरे घालून तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्या. त्यानंतर भाजीत शिजवलेली चवळी आणि चवीनुसार मीठ घालून एक उकळी काढून घ्या.
भाजीची ग्रेव्ही थोडी पातळ ठेवा. जेणेकरून भातासोबत खाता येईल. हा पदार्थ गावाकडे आवर्जून केला जातो. चवळी आरोग्यासाठी खूप पौष्टिक आहे. त्यामुळे आठवड्यातून एकदा ही भाजी खा.
शेवटी भाजीवर हिरवीगार कोथिंबीर भुरभुरवा. तुम्ही यात बटाटे देखील टाकू शकता. यामुळे भाजी वाढते आणि लहान मुल देखील आवडीने खातात.